मलायका आरोरापूर्वी अरबाज चढणार बोहल्यावर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या बॉलीवूड मधील चर्चेतील जोडी म्हणजे मलायका आरोरा खान आणि अर्जुन कपूर. ही जोडी लवकरच विवाहबद्ध होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. असे असताना मालयकाचा पूर्वीचा पती अरबाज खान मलायकाच्या आधी लग्न करणार आहे. असे संकेत स्वतः अरबाजाने दिले आहेत. सध्या अरबाज आणि त्याची परदेशी मत्रीण जॉर्जिया एंड्रियानी यांना अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना स्पॉट केले आहे.

एका कार्यक्रमादरम्यान अरबाज खान विवाहसंस्थेबाबत बोलला तो म्हणाला, ‘आपल्या देशात विवाहसंस्थेला खूप महत्व आहे. लग्न तुटण्याला विवाहसंस्था कारणीभूत नाहीत. मी तरुणांना लवकर लग्न करण्याचा सल्ला देईन. यावेळी बोलताना त्याने आपल्या लग्नाचा देखील खुलासा केला तो म्हणाला ,माझे लग्न ज्या पद्धतीने तुटले, त्याबद्दल मला जराही तक्रार नाही. अचानक काही गोष्टी बिघडल्या आणि लग्न तुटले. पण आता मी योग्य मार्गावर आहे. कदाचित मी नव्याने संसार सुरु करेल. असे अरबाजने म्हंटले आहे त्यामुळे तो लवकरच लग्न करणार असे दिसते आहे.

यावेळी पुढे बोलताना अरबाज म्हणाला, एकदा लग्न अयशस्वी ठरले, मग दुसऱ्यांदा करून काय फायदा, असे मानणाऱ्यांपैकी मी मुळीच नाही. कदाचित मी दुसऱ्यांदा लग्न करेल. अर्थात योग्य वेळी आणि एक योग्य व्यक्ती आयुष्यात आल्यानंतरच मी हा निर्णय घेईल,’ असे अरबाज म्हणाला.

जॉर्जिया एंड्रियानी आणि अरबाज खानची लव्ह स्टोरी ही आता सगळ्या जगाला माहिती आहे. सध्या दोघे प्रेमाच्या अखंड सागरात बुडाले आहे. दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलेय.