नवीन अध्यक्षांच्या शोधासाठी काँग्रसनं बनवली ‘या’ 5 दिग्गजांची टीम, गांधी कुटूंबियांशी ‘एकनिष्ठ’ असलेल्या खर्गे आणि वासनिक यांची नावे चर्चेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता  काँग्रेस अध्यक्षपदासाठी नवीन नाव  सुचवण्यासाठी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची आज बैठक सुरु झाली आहे.  या बैठकीत  संयुक्त पुरोगामी आघाडीच्या चेयरमन सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, अहमद पटेल, एके एंटनी यांचा सहभाग आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांचे नाव आघाडीवर आहे.

या पदाच्या निवडीसाठी राहुल गांधी यांना हस्तक्षेप करण्यासाठी विंनती करण्यात आली आहे. या निवडीत राहुल गांधी पक्षातील तरुण नेत्यांना हि कमान सोपवणार असल्याची माहिती मिळत आहे. वरिष्ठ नेत्यांना राहुल गांधी हे पद देण्याबाबत उत्सुक नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत हि वर्किंग कमिटी यासंदर्भातील निर्णय घेऊन नवीन नावाची घोषणा करणार असल्याची माहिती  महासचिव केसी वेणुगोपाल  यांनी दिली आहे. मात्र त्या बैठकीत होणारा निर्णय फक्त काँग्रेस वर्किंग कमिटी घेणार नसून यामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटी देखील महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. त्यांना देखील याविषयी विचारण्यात येणार असून सर्वांचे मत विचारात घेऊन या पदासाठी व्यक्तीची निवड केली जाणार आहे.

दरम्यान, गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले मल्लिकार्जुन खर्गे आणि महाराष्ट्र्रातील पक्षाचे नेते मुकुल वासनिक या दोघांचे नाव या पदासाठी आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दोघांनाही नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्याआधी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवता यांनी सचिन पायलट आणि मध्यप्रदेशमधील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवले होते. या महत्वाच्या बैठकीआधी सोनिया गांधी यांनी आपले राजकीय सल्लागार अहमद पटेल आणि एके एंटनी यांच्याशी या सभेच्या आधी महत्वाची चर्चा देखील केली होती.

आरोग्यविषयक वृत्त