पाकिस्तानशी न खेळणं म्हणजे त्यांच्यापुढे शरणागती पत्करणायाहून वाईट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – आगामी येणाऱ्या विश्वाचषकात भारत पाकिस्तान सामना होणार की नाही, याबाबत अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहे. काश्मीर मधल्या पुलवामात झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात CRPF चे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत पाक सोबत सामना खेळू नये, अशी मागणी जोर धरत आहे. काँग्रेसचे माजी मंत्री, खा. शशी थरूर यांनी भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानविरूध्दचा सामना खेळायला पाहिजे असं मत व्यक्त करत आहे. पाकिस्तानशी न खेळणं म्हणजे त्यांच्यापुढे पराभव पत्करण्याहून वाईट असं खासदार शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

खासदार शशी थरूर यांनी ‘1999 मध्ये कारगिल युद्धं झालं त्या वर्षीही भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कप पाकिस्तानशी खेळला आणि जिंकलासुद्धा. त्यामुळे यंदाच्या वर्षीही वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानशी खेळावं. असं न केल्यास ते शरणागती पत्करण्याहून वाईट होईल’ असे म्हटले आहे. १४ फेब्रुवारी जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

विश्वचषका पासून पाकिस्तानला बीसीसीआय रोखू शकत नाही. बीसीसीआय व प्रशासकांच्या समितीने (सीओए) अशा मागणीचा कुठलाही अर्ज तयार केलेला नाही. असे पाऊल उचलले तरीही आयसीसीद्वारे हा अर्ज फेटाळला जाईल, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. आयसीसीची मॅरेथॉन बैठक २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान दुबईत होईल. दरम्यान, ‘पाकिस्तानला विश्वचषका पासून बीसीसीआय रोखू शकत नाही’, असे आयसीसीने म्हटले आहे.

आयसीसी संविधानानुसार, सदस्य देशाने पात्रता गाठल्यास आयसीसी स्पर्धेत सहभागी होण्याचा त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे पाकला स्पर्धेपासून रोखता येणार नाही, असे हे अधिकारी म्हणाले. दरम्यान सीओए प्रमुख विनोद राय व डायना एडुल्जी यांच्या उपस्थितीत सीओएची शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता कमीच आहे. पाकला बाहेर काढणारा अर्ज तयार केला, तरी अन्य देशांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता नसून बीसीसीआयकडे बहुमत नाही. यावर मतदान झाले तरी बीसीसीआयचा पराभव निश्चित असेल.

माजी क्रिकेट सुनील गावस्कर म्हणाले की पाक ला विश्वचषकात खेळू देऊ नये, त्यांच्यावर बंदी आणावीस, असे काही जणांच म्हणणं आहे. पण ही गोष्ट सोपी नाही. भारत एकटा ही गोष्ट करू शकत नाही. जर भारताला पाकवर बंदी आणायची असेल तर त्यांना अन्य काही देशांचाही पाठिंबा लागेल. त्याचबरोबर भारतीय संघाने पाकविरुध्दचा सामना न खेळायचे ठरवले तर यामध्ये भारताचेच नुकसान होईल.