Pravin Darekar | राजकारण नाही तर शिवसेनेची विचारधारा चंचल झालीय, संजय राऊतांना उपरोधक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजकारण हे चंचल असतं (Politics is fickle) त्यामुळे 2024 सालच्या निवडणुकीचे (Election) आखाडे आम्ही काही आत्ताच बांधू शकत नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांनी म्हटले होते. संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रत्युत्तर देताना उपरोधक टोला लगावला आहे. राजकारण हे कधीच चंचल नसतं, राजकीय नेते हे चंचल असतात Political leaders are fickle. शिवसेनेची (Shivsena) विचारधारा आता चंचल झाली आहे, असा टोला दरेकर (Pravin Darekar) यांनी लगावला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

राजकारण कधीच चंचल नसतं
दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, संजय राऊत बोलतात त्याप्रमाणे राजकारणात घडत नाही. राजकारण कधीच चंचल नसते. राजकीय नेते हे चंचल असतात. पण आपली वैचारिक भूमिका आणि विचारधारा (Ideological role and ideology) ही चंचल नसावी. शिवसेनेच्या बाबतीत हिच गोष्ट घडत आहे. संजय राऊत यांनी विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला.

शिवसेनेची नुसती टोलवाटोलवी
मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) विषय आता मोदींच्या (PM Narendra Modi) हातात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर बोलताना दरेकर म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन शिवसेना नुसती टोलवाटोलवी करत आहे.

5 वर्षाच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्षे राहिल, असे विधान राऊत यांनी केले होते. यावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : not politics shiv sena ideology has become fickle pravin darekar remark sanjay raut

हे देखील वाचा

‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी

पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

Pune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं पुण्यात मोठं विधान

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा