‘ते’ दहशतवादी ‘नव्हे’ तर निघाले ‘दरोड्या’तील आरोपी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून ते दोघे लपून छपून रहात होते. त्यांच्या एकंदर वागणूकीमुळे त्यांच्याविषयी आजू बाजूंच्यांना संशय आला. त्याची वार्ता दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली या माहितीची खातरजमा करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाने जुन्नर तालुक्यातील आळे येथून त्या दोघांना ताब्यात घेतले.

सचिन सखाराम मेंटागळे (वय ३३, रा. बोरी, ता. जुन्नर) आणि निवृत्ती तबाजी कुटे (वय ७०, रा. पिंपरी पेंढार, ता. जुन्नर) अशी त्यांची नावे आहेत.

पुणे दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी जुन्नर तालुक्यातील आळे गावातून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रात्रभर कसून चौकशी केली. पण, त्यांचा कुठल्याही दहशतवादी घटनेशी संबंध नसून त्यांनी ओतूर येथे एकाचे अपहरण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून हे दोघेही फरार होते. त्यामुळे ते लपून छपून रहात होते.

जमिनीच्या वादातून सचिन मेंटागळे व त्याच्या साथीदारांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये सत्यवान धर्मा पानसरे यांच्या घरावर दरोडा टाकून त्यांचे अपहरण केले होते. तसेच त्यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी ओतूर पोलिसांनी दरोडा, अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला. त्यात त्यांनी सचिन कुटे, सुरेश ऊर्फ पप्पू पानसरे आणि अशोक घोलप यांना अटक केली होती. तेव्हापासून सचिन मेंटागळे आणि निवृत्ती कुटे हे फरार झाले होते.

ओतूर पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र, ते लपून रहात असल्याचे त्यांच्या एकंदर वागणूकीमुळे लोकांना संशय आला. ही वार्ता एटीएसपर्यंत पोहचली व त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. पण त्यांचा कोणत्याही दहशतवादी कृत्याशी संबंध नसल्याचे व ते पोलिसांपासून लपून रहात असल्याचे निष्पन्न झाल्यावर दोघांना ओतूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जाणून घ्या कढीपत्त्याचे फायदे !

केळी खाण्याचे १० फायदे, जाणून घ्या

मक्याचा उपमा खाण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

‘हे’ उपाय करा अन् मेकअप न करता दिसा एकदम सुंदर, जाणून घ्या

मुलांना नैसर्गिकरित्या गोरे करतात ‘हे’ ५ घरगुती उपाय; जाणून घ्या

हिंगात अनेक औषधी गुणधर्म, ‘हे’ २० रामबाण उपाय, जाणून घ्या