चोरांनी नाही तर मालकानेच केला ‘तो’ खून

औरंगाबाद :  पोलीसनामा ऑनलाईन

चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हायवाचालकाचा खून झाल्याचा बनाव करणाऱ्या दोघांना औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फ्लॅटमधून पंखा चोरुन नेल्याच्या कारणावरुन मालक आणि त्याच्या मित्रांनीच खून करुन बनाव आरोपींनी रचला होता. मात्र, गुन्हे शाखेने तपास करुन आरोपींना अटक केली. ही घटना गुरुवारी (दि.२०) रात्री घडली होती.

नितीन उर्फ बाळू भीमराव घुगे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मनोज बद्रीनाथ डव्हारे (वय-२४) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार नील काकासाहेब काकडे पाटील, दत्ता भांगे आणि शुभम पाटील हे तिघे फरार आहेत.  मृत नितीनचा भाऊ सचिन घुगे याच्या तक्रारीवरून सिडकाे पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आराेपींमधील नील पाटील  बाॅक्सिंगचा राष्ट्रीय खेळाडू राहिलेला असून त्याच्याविरुद्ध क्रांती चाैक पाेलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’feda0c34-be64-11e8-a7cb-d5ee02bd1a95′]

मालकाने बोलाविल्यामुळे घराबाहेर पडलेला हायवा चालक नितीन भीमराव घुगेचा गुरुवारी रात्री संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मध्यवर्ती जकात नाका परिसरात चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचे मृताचे मित्र आणि मालकाने पोलिसांना सांगितले. मात्र यानंतर नितीनच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हेशाखेने याप्रकरणातील बारकावे तपासण्यास सुरुवात केली. यातून त्यांना काही संशयास्पद बाबींचा उलगडा झाला आणि ते खऱ्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोंचले. तपासात  फ्लॅटमधून पंखा चोरून नेल्याच्या कारणावरून नितीनचा मालक आणि त्याच्या मित्रांनी त्याचा खून केल्याचे  निष्पन्न झाले. यावरून पोलिसांनी नितीनचा मालक कंत्राटदार मनोज डवरे पाटील, नील काकासाहेब पाटील, शुभम पाटील आणि दत्ता भांगे यांना ताब्यात घेतले आहे.

खडकी येथील सीएसडी कॅन्टीनमधून प्रेशर कुकर चोरणारे अटकेत 

मनोज डवरे हा मनपाचा कचरा वाहतूक करणारा ठेकेदार आहे. गुरुवारी रात्री मनोज आणि त्याचा मित्र नील पाटील याने खुनाचा कट रचला. यानुसार नितीनला त्यांनी कामाचे कारण सांगून फ्लॅटवर बोलावून घेतले. यानंतर मनोज, नील , शुभम पाटील आणि दत्ता भांगे यांनी त्याला मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नितीनला त्यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. येथेच त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी मनोजने नितीनच्या भाऊ सचिनला फोन करून तुम्ही घाटीत या त्याचा अपघात झाला असल्याचे सांगितले. सचिन घाटीत गेला असता त्याने नितीनचा चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे सांगितले. गुन्हे शाखेच्या तपासात हा बनाव असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.