…म्हणून आता मी राजीनामा देणार नाही, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादीत नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. मंत्रीपद न मिळालेले माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके हे राजीनामा देण्याच्या तयारीत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके हे मंत्रीपद मिळाले नसल्याने नाराज झाले होते. त्यांनी राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढली आहे. त्यामुळे प्रकाश सोळंके यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची नाराजी दूर झाली आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झाले होते. ते आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारी होते. मात्र, त्यांना आज (मंगळवार) मुंबईत बोलावण्यात आले. मुंबईत त्यांच्याशी जयंत पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार यांनी चर्चा केली. शरद पवार यांनी देखील सोळंके यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माझी नाराजी दूर झाली असून राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, आम्ही प्रकाश सोळंके यांची समजूत काढण्याचे काम करत आहोत. मंत्रिमंडळ विस्तार होताना सगळ्यांना घेता येत नाही. त्यामुळे ज्यांना मंत्रिपद दिले गेले नाही त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार सांगितले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/