नोटाबंदीचा वाढदिवस की श्रद्धांजली : पृथ्वीराज चव्हाण

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन – नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण झाले परंतु सदर निर्णयातून काहीही साध्य न झाल्याने मी आज काळा दिवस साजरा करून या गोष्टीचा निषेध करतो असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर सडकून टीका केली. आज पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “नोटाबंदीची घोषणा झाली तेव्हा आम्हा त्याचं सावधगिरीने स्वागत केलं. निर्णय चांगला आहे. हेतू चांगला आहे म्हणून सावधगिरीने स्वागत केले. परंतु निर्णयाचे स्वागत जरी केले असले तरी मनामध्ये पूर्णपणे शंका होती की, हे सगळं कसं शक्य आहे. परंतु काही दिवसातंच हे लक्षात आलं की, नोटाबंदीसाठी कसंलीही पूर्व तयारी केली गेली नव्हती. कसलंही नियोजन केलं नव्हतं, कोणाशीही सल्ला मसलत केली गेली नव्हती. या निर्णयाला 90 टक्के विरोध दर्शवण्यात आला होता. सुरुवातीला मोदींनी 50 दिवस मागितले होते. परंतु या 50 दिवसांत काहीही विशेष असं बाहेर आलं नाही.”

“देशात 125 कोटी लोकं राहतात. मोठ्या संख्येने लोकांना नोटाबंदीच्या वेळेत रांगेत उभे राहण्याचा त्रास सहन करावा लागला होता. 18 वर्ष वय असणाऱ्या प्रत्येकाला नोटाबंदीवेळी नोटा बदलण्यासाठी त्रास झाला आहे. जवळजवळ 80 ते 90 कोटी लोकांवर याचा परिणाम झाला. एवढ्या लोकांच्या जीवनात अस्थिरता निर्माण झाली. नोटाबंदीचा उद्देश जो की काळा पैसा बाहेर काढणे हा ही यातून काही साध्य झाला नाही. आम्ही वेळोवेळी सांगत होतो की, सुमारे 6 टक्के पैसाच पक्त रोखीच्या रुपात अस्तित्वात आहे. बाकी सर्व संपत्ती ही सोने, चांदी, रिअल इस्टेट इतकेच नाही  तर परदेशी बँकांमध्ये आहे. इतकेच नाही तर हा नोटाबंदीचा वाढदिवस की श्रद्धांजली म्हणू हेच कळत नाही.” असंही ते म्हणाले.

दरम्यान त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी बाबत त्यांनी भूमिका देखील मांडली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र लढणार का ? मनसे ला बरोबर घेणार का ? असे प्रश्न त्यांना विचारले असता चव्हाण म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित लढणार असून जागा वाटपा बाबत सकारात्मक चर्चा देखील झाली असून पुढील बैठक मुंबई मध्ये याच आठवड्यात होणार आहे.

इतकेच नाही तर आम्ही मनसेला सोबत घेणार नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्यास तयार असून त्यांच्यासाठी काही जागा सोडण्यास तयार असल्याची भूमिका त्यांनी मांडल्याने आगामी काळात राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मह्त्त्वाचे म्हणजे आम्ही एमआयएम सोबत जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितले. मी आमदार आहे त्याच ठिकाणावरून आमदारकी लढवणार आहे. पुण्याची जागा कोण लढविणार हे निश्चित झाले नाही असं ते म्हणाले. अवनी आणि राफेल डील प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याची आवश्यकता होती. मात्र या सरकारने तिचा फेक इन काऊंटर केला असं चव्हाण म्हणाले.