बेजन दारुवाला यांच्या Top 10  भविष्यवाणी, ‘ही’ भाकिते ठरली ‘अचूक’, जाणून घ्या

अहमदाबाद : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती असलेले सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य बेजन दारुवाला यांचे शुक्रवारी (दि.29) अहमदाबाद येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 89 वर्षांचे होते. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. ज्योतिषशास्त्र क्षेत्रातील एक अढळ तारा निखळल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त करण्यात आली. ज्योतिषशास्त्राविषयी लोकांच्या असलेल्या दृष्टिकोनाला एक वेगळी दिशा देण्याचे काम त्यांनी केले.

पारसी घराण्यात जन्मलेल्या दारुवाला हे गणेशाचे मोठे भक्त होते. गणपतीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. एखाद्याचे भविष्य सांगताना ते गणेशजी कहते है या शब्दांचा वापर करायचे. सकारात्मकता असलेल्या दारुवाला यांच्याकडे आलेल्या व्यक्तिलाही त्याच सकारात्मकतेने भारून टाकायचे. अमेरिकेत ते विषेश प्रसिद्ध होते. देश-परदेशात ख्याती असलेल्या बेजन दारुवाला यांची अनेक भाकिते खरी ठरली होती.

कोरोनाचे भाकित
बेजन दारुवाला यांनी खेळ, देश, राजकारण याबाबत अनेक वेळा भाकिते नोंदविली होती. त्यापैकी अनेक भाकिते एकदम अचूक ठरली. कोरोना संदर्भात त्यांनी भाकित केले होते, असे सांगितले जाते. यासंदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी यूट्युवबर शेअर केला होता. यामध्ये त्यांनी चीनमधूनच कोरोना व्हायरस आल्याचे सांगितले होते. कोरोना विषाणू संसर्ग जगासाठी आव्हान सिद्ध होईल, असे ते म्हणाले होते. पाश्चात्या ज्योतिषाचा उत्तम अभ्यासक असलेल्या दारुवाला यांनी चीनची रास चीनपासून कोरोना आणि कोरोनाचा भारतावरील प्रभाव यावर त्या व्हिडिओत विवेचन केले होते.

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. ती खरी ठरली. 2014 मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा होती. अनेकांचा त्याला विरोध होता मात्र, पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच विराजमान होतील असे भाकित त्यांनी वर्तवले होते. त्यांचे हे भाकित अचूक ठरले.

अलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी
भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलही त्यांनी भाकित केले होते. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी विराजमान होती, हे त्यांचे भाकित अचूक ठरले. भाजपच्या लोकसभेत जागा वाढण्याबाबतही त्यांनी भविष्यवाणी केली होती. यासह गुजरात भुकंप, भोपाळ गॅस गळती, भारताची विश्वचकातील कामगिरी, भारतरत्न सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन या सारख्या दिग्गज व्यक्तिंबद्दल त्यांनी केलेली भाकितं खरी ठरली आहेत.

संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू
संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू होईल असे भाकित बेजन दारुवाला यांनी केले होते. 23 जून 1980 रोजी संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर दारुवाला चर्चेत आले. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या, मोरारजी देसाई पंतप्रधानपद तसेच 2004 रोजी काँग्रेसची सत्ता केंद्रात येणे आणि मनमोहन सिंग यांची पंतप्रधापदी वर्णी लागेल, अशी अनेक भाकिते त्यांनी केली होती.

इंग्रजीचे प्रोफेसर ते प्रसिद्ध ज्योतिषी
बेजन दारुवाला यांचा जन्म 11 जुलै  1931 रोजी झाला. इंग्रजी विषयात त्यांनी पिएचडी केली होती. त्यांनी अहमदाबाद येथे एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून काही वर्षे विद्यादानाचे काम केले. यांनतर ते ज्योतिषशास्त्राकडे वळले. ज्योतिषशास्त्र, अंक ज्योतिष, हस्तरेषा, टॅरो कार्ड, पाश्चात्य ज्योतिष या विषयांत त्यांचा विशेष हातखंडा होता. ते कवी देखील होते. ज्योतिष विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहली होती. त्यांच्या पत्नी टॅरो कार्ड रिडर होत्या. त्यांचा मुलगा नस्तूर दारुवाला हे देखील ज्योतिष क्षेत्रातच कार्यरत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like