पुणे महापालिका आणि प्रशासनाच्या पातळीवर लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही : महापौर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याची अफवा काहीजण पसरवित असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट केलं असून तसा कोणताही विचार महापालिका किंवा प्रशासन करत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.

वृत्तवाहिन्यांच्या जुन्या बातम्यांच्या क्लिप्स सध्या व्हायरल करून अफवा पसरवली जात आहे. या माहितीमध्ये कोणतेही तथ्य नसून पुणे महापालिका आणि प्रशासनाच्या पातळीवर असा कोणताही विचार नाही. तुम्हाला असे काही संदेश आल्यावर ते पुढं पाठवण्याचे टाळावे असेही सांगण्यात आलं आहे.