‘…तेव्हा काही करता आले नाही , मात्र आता सैन्याने काय केले हे सर्वांनी पाहिलेच…!’

कन्याकुमारी : वृत्तसंस्था – भारत पाकिस्तानच्या तणाव निवळताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथे विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले आहेत. त्यावेळी त्यांनी देशातील सैन्याचे कौतुक केले. तर विरोधकांवर टीकाही केली आहे. आज भारतात वापसी करणाऱे विंग कमांडर अभिनंदन यांचा गर्व आहे, असं म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात केली.

२६/११ ला जे घडले, त्यावरून भारताने दहशतवाद्यांविरूद्ध कारवाईची अपेक्षा केली . परंतु काही झाले नाही. मात्र जेव्हा उरी आणि पुलवामा येथील घटना घडल्या तेव्हा आपल्या बहादुर सैनिक काय केले ते सर्वांनी पाहिलेच. मी राष्ट्रांची सेवा करणाऱ्यांना सलाम करतो, असं मोदींनी म्हटलं.

नरेंद्र मोदींच्या द्वेषाने काही पक्षांनी भारताचा द्वेष करण्यास सुरुवात केली आहे. यात आश्चर्य नाही, तर संपूर्ण राष्ट्र आपल्या सशस्त्र दलांना समर्थन देत आहे. जग दहशतवादाविरुद्ध भारताच्या लढाईचे समर्थन करीत आहे. परंतु काही पक्षांना आमच्या भूमिकेवर संशय आहे, असंही त्यांनी म्हटलं.

https://twitter.com/ANI/status/1101426428158058496