Coronavirus : सेवा बंद ठेवल्याबद्दल सोलापूरातील 28 रुग्णालयांना नोटिसा, सील ठोकण्याचा दिला आदेश ?

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना आपत्तीच्या काळात आरोग्य सेवा बंद ठेवल्याचे सांगत शहरातील 28 रुग्णालयांच्या प्रमुखांना महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. रुग्णालय तत्काळ सुरू न केल्यास ते सील करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. परंतु, अनेक रुग्णालयांच्या डॉक्टरांनी या नोटिसीला हरकत घेतली आहे. आरोग्य विभागाने प्रत्यक्ष माहिती न घेता ऐकीव माहितीवर ही नोटीस बजावल्याचा आरोप केला आहे.

महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले म्हणाले, जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील नर्सिंग होम, हॉस्पिटल यांना ओपीडी व आयपीडीच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार सुविधा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, अनेक रुग्णालये बंद असल्याच्या तक्रारी येत आहेत. रुग्ण थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. सरकारी यंत्रणेवर ताण येत आहे. आपत्तीच्या काळात आपली रुग्णालये बंद ठेवणाºया डॉक्टरांवर कारवाई करा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. लोकांनी काही रुग्णालयांबाबत तक्रारी केल्या. यात २८ नर्सिंग होम, रुग्णालये बंद असल्याचे आढळून आले. यासंदर्भात दोन दिवसांत खुलासा सादर करावा. खुलासा सादर न केल्यास रुग्णालय, नर्सिंग होम सील करण्यात येणार आहे.

यांना बजावल्या नोटिसा
जाधवर नर्सिंग होम, भंडारी हॉस्पिटल, विजय क्लिनिक, स्पर्श निरो केअर हॉस्पिटल, सुरतकर नर्सिंग होम, लोणीकर हॉस्पिटल, बिराजदार हॉस्पिटल, झांबरे नर्सिंग होम, अंबिका हॉस्पिटल, माईंड इन्स्टिट्यूट न्यूरोफिजेटरी अँड डायटेशन अँड रिहॅबिटेशन सेंटर, एस. एस. बलदवा न्यूरो सायन्स अँड ह्युमन केअर हॉस्पिटल, सारडा हॉस्पिटल, चिडगुपकर हॉस्पिटल, जैन हॉस्पिटल, मांगल्य नर्सिंग होम, सुयश नर्सिंग होम, ओंकार नर्सिंग होम, लाईफ लाईन हॉस्पिटल, साठे नर्सिंग होम, शोभा नर्सिंग होम, कृष्णामाई नर्सिंग होम, संजीवनी नर्सिंग होम, व्यंकटेश हॉस्पिटल, सावस्कर हॉस्पिटल, दंतकाळे नर्सिंग होम, तुंबळ हॉस्पिटल, कार्वेकर हॉस्पिटल, कुमठेकर हॉस्पिटल.