खासदार नवनीत राणा यांना हायकोर्टाची नोटीस

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन –  अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना नागपूर हायकोर्टाने नोटीस बजावली आहे.  वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नंदकुमार अंबाडकर यांनी नवनीत राणा यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केली होती. यावेळी सुनावणी करताना हायकोर्टाने त्यांना हि नोटीस पाठवली आहे.

या याचिकेत आव्हान देताना म्हटले आहे कि, हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असून नवनीत राणा या पंजाब येथील ‘लुभाणा’ जातीच्या आहेत. त्यामुळे त्यांनी दिशाभूल करून या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्याची  विनंती याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केली होती. त्याचबरोबर फेरनिवडणूक घेण्याची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली होती.

दरम्यान, सुनावणीनंतर न्यायालयाने राणा यांना नोटीस बजावली असून लवकरात लवकर उत्तर देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like