निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीसा

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन

सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्याच्या कारणावरून 39 अधिकार व कर्मचार्‍यांना महापालिका आयुक्त तसेच निवडणूक अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावलीआहे. यासंदर्भात 24 तासात खुलासा न केल्यास पोलिस कारवाईचा इशार नोटीसीद्वारे दिला आहे.
[amazon_link asins=’B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’05893697-89e3-11e8-8b02-5fbe23327e83′]

या बाबत सविस्तर वृत्त असे की,  महापालिका निवडणुकीसाठी (दि. 14) वार शनिवार रोजी  प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला तब्बल 21 मतदान केंद्र प्रमुख, मतदान अधिकारी क्रमांक 1 चे 7 , दोनचे 1, तीनचे 10 अशा 39 कर्मचारी-अधिकारी अशांनी दांडी मारली. यामुळे खेबुडकर यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. 24 तासाच्या आत समाधानकारक खुलासा न केल्यास पोलिस कारवाई करण्याचा इशार नोटीसद्वारे दिला आहे.

यामध्ये सामाजिक वनिकरण, कृषी, बांधकाम, शिक्षण, महसूल आदी विभागातील कर्मचाऱयाचा समावेश आहे. इचलकंरजी, शिरोळ, पलूस, आष्टा, तासगाव येथील शासकीय विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

दरम्यान, निवडणुक कामासाठी सुमारे साडेतीन हजारावर कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. या सर्व कर्मचार्‍यांना अधिकार्‍यांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले. रविवारी (ता.22) रोजी पुढील टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी हजर रहावे, असे आदेश खेबुडकर यांनी दिले आहेत.