राष्ट्रवादी च्या नगरसेवकांना नोटिसा : पक्षादेश डावलला

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या बाबासाहेब वाकळे यांच्या बाजुने मतदान करणाच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी बोलताना फाळके म्हणाले कि, कोणत्याही परिस्थितीत नगर महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करायची नाही, असा आदेश शरद पवार, अजित पवार व जयंत पाटील यांनी नगरच्या नेत्यांना दिला होता. मात्र, नगरच्या स्थानिक नेत्यांनी हा आदेश पाळलेला नाही. याबाबीची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. आदेशाचे पालन न करणाच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी राष्ट्रवादीच जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी दिली.

याला स्थानिक आमदार जबाबदार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन पक्षविरोधी कृती केली आहे. याला पक्षाचे स्थानिक आमदार जबाबदार आहेत, असा आरोप फाळके यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यांवर