Black Money Act : IT विभागानं 12000 कोटी रुपयांच्या 422 प्रकरणात जारी केली नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभागाने डिसेंबर 2019 पर्यंत परदेशी काळ्या पैशांबाबत गैर संपत्ती 12 हजार 600 कोटी रुपयांहून अधिकच्या रकमेबाबत 422 प्रकरणांमध्ये नोटीस काढली आहे. मंगळवारी संसदेत ही माहिती देण्यात आली. अर्थ राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले की,आयकर विभागाने काळा पैसा आणि कर कायदा लागू झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने एक जुलै 2015 पासून सतत कारवाई केली आहे.

422 प्रकरणांबाबत नोटीस जारी
राज्यसभेला लेखी उत्तर देताना ते म्हणाले, ‘परिणामी 31 डिसेंबर 2019 पर्यंत या कायद्यांतर्गत 422 प्रकरणात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये अघोषित परकीय मालमत्ता आणि 12,600 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा समावेश आहे. एचएसबीसी प्रकरणात विना परवाना परदेशी बँक खात्यातील ठेवी संदर्भात आतापर्यंत 8,460 कोटींपेक्षा जास्त अज्ञात उत्पन्न कर आणि 1,290 कोटी रुपयांच्या दंडाच्या कक्षेत आणले गेले आहे. याबाबत सुमारे 204 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

परदेशी खात्यांमध्ये जमा केले गेले 11,010 कोटी : अनुराग ठाकूर
अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले की, इंटरनेशनल कंसोर्टियम ऑफ इंवेस्टिगेटिव जर्नलिस्ट्स द्वारे खुलासा करण्यात आलेल्या प्रकरणांची करण्यात आलेली तपासणी यामध्ये आतापर्यंत अज्ञात विदेशी खात्यांमध्ये 11,010 कोटी रुपयांपेक्षा अधिक धन जमा असल्याची माहिती मिळाली आहे. जवळजवळ 99 तक्रारी याबाबत दाखल करण्यात आलेल्या आहेत. तसेच तपासामध्ये 1,550 कोटी रुपयांपेक्षा अधिक अघोषित विदेश गुंतवणुकीबाबत माहिती मिळाली आहे. तसेच याबाबत एकूण 38 तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.