Pune Crime News | कोरेगाव पार्क येथील फेमिना स्पा मधील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, तीन महिलांची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell) पर्दाफाश केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.14) कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील लेन नं. 5 येथील फेमिना स्पा (Femina Spa) येथे करण्यात आली. या कारवाईत तीन महिलांची सुटका करुन चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime News) करण्यात आला आहे. तर दोघांना ताब्यात घेतले आहे.

 

कोरेगाव पार्क येथील आशियाना पार्क को. ऑप. सोसायटीमधील फेमिना स्पा येथे वेश्याव्यवसाय (Prostitution)
सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली.
(Pune Crime News) त्यानुसार पथाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता
या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे आढळून आले.
पथकाने छापा टाकून तीन पीडित महिलांची सुटका केली.
त्यावेळी स्पा सेंटरच्या दोन मॅनजेर यांना ताब्यात घेतले.
पथकाने मॅनेजर, स्पा चालक आणि जागा मालक यांच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) गुन्हा दाखल केला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या मॅनेजर आणि पीडित महिलांना पुढील कारवाईसाठी कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाब कर्फे,
मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Noticias de crimen de Pune | Raqueta de ‘sex’ reventada en Femina Spa en Koregaon Park, tres mujeres rescatadas

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police News | गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांचा पदक देऊन सन्मान

Rajgad Fort | पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर रात्रीच्या मुक्कामाला बंदी, उल्लंघन केल्यास…

Pune Crime News | मोक्का गुन्ह्यात दीड वर्ष फरार असलेल्या शेवाळे टोळीच्या प्रमुखाला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या