रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केले असे काही की…

चंदिगड : पोलीसनामा ऑनलाइन –   रुसून माहेरी जाऊन राहत असलेल्या पत्नीला बदनाम(Notoriety) करण्यासाठी पतीने टोकाचे पाऊल उचलल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबमधील भटिंडा येथे उघडकीस आला. पत्नीला बदनाम(Notoriety) करण्याच्या इराद्याने पतीने तिच्या नावे फेसबुकवर खोटे अकाऊंट उघडले. त्यानंतर पत्नीच्या माहेरी आसपास राहणाऱ्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तसेच या अकाऊंटवरून अनेक अश्लील छायाचित्रे, मेसेज लोकांना पाठवले. दरम्यान पती आपली बदनामी करत असल्याचे कळताच पत्नी थेट पोलिसात धाव घेत तक्रार दिली आहे. पतीवर नाराज असलेली ही महिला बऱ्याच काळापासून माहेरी पतियाळा येथे राहत होती.

भारतीय हवामान खात्याचा सुधारीत अंदाज ! यंदा 101 टक्के पाऊस पडणार, जाणून घ्या कोणत्या भागात किती पाऊस.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत या महिलेने म्हटले आहे की, तिचा विवाह भटिंडामधील सीयूल पत्ती मेहराज गावातील धरमिंदर सिंग यांच्याशी झाला होता. धरमिंदर यांचा हा दुसरा विवाह आहे. दरम्यान, सासरी चांगली वागणूक मिळत नसल्याने ही महिला माहेरी येऊन राहत होती. मात्र ही बाब पती धरमिंदर याला रुचत नव्हती. त्यामुळे धरमिंदरने पत्नीला बदनाम करण्यासाठी तिच्या नावे फेसबुकवर खाते उघडून लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर या अकाऊंटवरून अनेक अश्लील छायाचित्रे आणि मेसेज लोकांना पाठवले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी पती त्या युवकांसोबत पत्नीच्या खोट्या आयडीवरून अश्लील चॅट करत असे.नंतर पत्नीला त्रास देण्यासाठी त्याने अश्लील चॅट आणि फोटोंचे स्क्रीन शॉट पाठवले. पतीच्या या अश्लील कृतीमुळे त्रस्त झालेल्या महिलेने पोलिसांत तक्रार दिली होती. तसेच आरोपीविरोधात आयटी अ‍ॅक्ट 2000 मधील कलम 68 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या आता या प्रकरणात दोष सिद्ध झाल्यास या पतीला 3 वर्षांचा कारावास आणि 5 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाशी शिक्षा होऊ शकते. तसेच आयटी अ‍ॅक्ट 67 अन्वये दोन वेळा दोषी आढळल्यानंतर सदर व्यक्तीस 5 वर्षांचा कारावास आणि 10 लाखांचा दंड होऊ शकतो.

खा. सुप्रिया सुळेंचा थेट सवाल, म्हणाल्या – ‘मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर काय?’

Sanjay Raut : ‘भाजपचं सरकार राज्यात येणार नाही हे पवारांनी फडणवीसांना सांगितलं असेल’

चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा, म्हणाले – ‘आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील’

डोळ्यांच्या समस्येपासून ‘कब्ज’मध्ये देखील फायदेशीर ठरतात हिरवे धणे, जाणून घ्या 5 चमत्कारी फायदे