तडीपार केल्यानंतरही शहरात फिरणारा गुंड जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तडीपार करण्यात आलेले असतानासुध्दा शहरात फिरणाऱ्या तडीपार गुंडाला गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने अटक केली आहे. त्याला अटक करून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अशोक उर्फे बॉबी विजय काकडे (रा. ११८७/६८ घोले रोड मॉडर्न बिल्डींग शिवाजीनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या युनीट ३ चे पथक गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक विल्सन डिसोझा यांना माहिती मिळाली की, शिवाजीनगर पोलीस स्टेशन कडील तडीपार गुन्हेगार अशोक उर्फे बॉबी विजय काकडे हा घोले रोड येथे थांबला आहे. त्यानंतर लागलीच पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंबई पोलीस अॅक्ट कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर शहरातील डेक्कन, शिवाजीनगर व इतर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक निकम पोलीस कर्मचारी प्रशांत पवार, विल्सन डिसोझा, अतुल साठे, संदिप राठोड, सचिन गायकवाड, कैलास साळुंके यांच्या पथकाने केली.

Article_footer_1
Loading...
You might also like