तडीपार गुंडाला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातून २ वर्षासाठी तडीपार करण्यात आलेले असताना आलेल्या एका तडीपार गुंडाला गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने अटक केली.

सागर श्रीकांत वाघवले (रा. मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील सराईत गुंड, गुन्हेगार, फरार व पाहिजे असलेले गुन्हेगार यांचा गुन्हे शाखेक़डून शोध सुरु आहे. दरम्यान सागर वाघवले याला शहरातून २ वर्षांकरता शहरातून तडीपार करण्यात आले आहे. तरीही तो सदानंदनगर भागात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळी त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आय़ुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, उत्तम बुदगुडे, सहायक पोलीस फौजदार बाबा चव्हाण, कर्मचारी वैभव स्वामी, अनिल घाडगे, अजय थोरात यांच्या पथकाने के