पुणे : अट्टल गुन्हेगार गावठी पिस्तूलासह जेरबंद

notorious criminal arrested with pistol

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कंबरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

जयेश लोखंडे असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फऱासखाना पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी मंगळवार पेठेत असलेल्या शिवाजी आखाड्याजवळील कोंबडी पुलावर एकजण पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती येणार आहे. अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि जयेश लोखंडे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे कंबरेला लावून ठेवलेले एक गावठी पिस्तूल व २ काडतुसें मिळून आली. पोलिसांनी ती जप्त केली आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आय़ुक्त प्रदिप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक वाय. पी. सुर्यवंशी, कर्मचारी खुटवड, चव्हाण, चौगुले, वाल्मिकी यांच्या पथकाने केली.