नोकरीची गोष्ट ! आगामी 5 वर्षांत ‘या’ क्षेत्रात उपलब्ध होणार 7.5 कोटी JOBs; जाणून घ्या काय करावे लागेल ?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आता अर्थव्यवस्था सुधारत आहे. यासह कंपन्यांमध्ये पुन्हा भरती सुरू झाली आहे. म्हणजेच रोजगाराच्या नवीन संधी उघडत आहेत. त्यामुळे आता बेकार आणि रोजगार करणार्‍यांसाठी काय नवीन संधी आहेत ? हे जाणून घेऊया. स्किलसॉफ्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कमल दत्ता यांच्याकडून कौशल्य विकास आणि त्या तयार करण्याच्या पद्धतींद्वारे डिजिटल तंत्रज्ञानातील नोकरीत मिळण्याची संधी’याबाबत त्यांचे विचार आणि अभ्यासात्मक मत जाणून घेऊया.

याबाबत स्किलसॉफ्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कमल दत्ता म्हणाले, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक फ्यूचर ऑफ जॉब अहवालानुसार ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि एआय या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात 7.5 दशलक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत. या नोकर्‍या डेटा अ‍ॅनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, एआय आणि एमएल स्पेशॅलिस्ट, प्रोसेस ऑटोमेशन स्पेशलिस्ट, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन स्पेशलिस्ट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी स्पेशलिस्ट आणि डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये यांसारखी पदं असतील.

प्रश्नः साथीच्या काळात नोकरी गमावलेल्या लोकांनी काय करायला हवे?

उत्तर: दुर्दैवाने, कोरोना काळात सर्व स्तरावर कार्यरत असणार्‍यांना नोकर्‍या गमावल्या आहेत. माझा वैयक्तिक सल्ला असा आहे की, घाबरून जाऊ नका. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. नेटवर्किंगसाठी योग्य वेळेचा उपयोग करा. व्यावसायिक सोशल मीडिया चांगल्या प्रकारे जाणून घ्या, त्यातील बारकावे समजून घ्या. उद्योगशील नेत्यांकडून सल्ला घ्या. नोकरीसाठी आवश्यक असणारा आपला सीव्ही सुधारा. तसेच आपली कौशल्य सुधारित करा. आणि योग्य संधीची वाट पहा. संयम बाळगा.

प्रश्नः या काळात नवीन कौशल्ये विकसित करण्याची आणि त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे का? जर असेल, तर ते कशी करावीत?

उत्तरः डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढील 2-3 वर्षांत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच तेथे उत्तम प्रतिभेची कमतरता आपल्याला दिसून येईल. यामुळे, प्रतिभेला भरपूर मागणी असेल.

कौशल्याच्या विकासासाठी उमेदवारांनी वेळ दिला पाहिजे. तसेच त्यानुसार काम केले पाहिजे, याचा फायदा निश्चित त्यांना होईल. जेव्हा शिकायची इच्छा दर्शविली किंवा मनात आणली तर, त्यासाठी इंटरनेट हा एक खजिना आहे. या इंटरनेटचा योग्यप्रकारे वापर केल्यास त्याचा लाभ आपणाला झालेला दिले.

आपला स्मार्टफोन हे विकास करण्यासाठी एक उत्कृष्ट डिजिटल साधन असू शकते. यावर पुस्तके, व्हिडिओ, पॉडकास्ट, ऑनलाइन कोर्सच्या रूपात अनेक स्त्रोत उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, मला असे वाटते की, एखाद्याने अधिक कठोर तांत्रिक कौशल्ये अवगत केली पाहिजेत.परंतु सॉफ्ट कौशल्यांचा विकास देखील केला पाहिजे. जे नोकरी मिळविणे आणि टिकवून ठेवणे या दोन्ही गोष्टींत महत्त्वपूर्ण म्हणता येईल.

प्रश्न: या कोरोना काळात बरेच अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध आहेत. जर कोणी हा कोर्स करत असेल तर याच्या आधारावर कंपन्या त्यांना कामावर घेतील का?

उत्तरः कंपन्या नेहमी अशा व्यक्तींचा शोध घेत असतात जे कौशल्य, सामान्य ज्ञान आणि उद्योगाविषयी या चालू घडामोडीविषयी अवगत असतात. मला असे वाटते की, एखाद्याने कौशल्य शिकण्यासाठी केवळ उपलब्ध स्त्रोतांचा वापर करावा. वेगवेगळ्या माध्यमातून ज्ञान आत्मसात करावे. तसेच त्याचा प्रसार आणि वापर करावा. त्याचे फायदे, तोटे आदी लक्षात घ्यावेत. तसेच केवळ वापर करून त्याचा उपयोग देखील करता आला पाहिजे. अन्यथा, हे ज्ञान केवळ कागदावरच राहील.

प्रश्नः आता मार्केट हळूहळू सुरू होत आहे. मग, तरुणांनी नोकरी कुठे आणि कशी शोधावी? याबाबत काय सांगाल.

उत्तरः नोकरी शोधण्यासाठी आधीच प्लॅटफॉर्म तयार आहेत. काय महत्त्वाचे आहे आणि काय नाही याचा तेे शोध घेत आहेत. मला असे वाटते की संवाद, कार्यकारी उपस्थिती, लेखन क्षमता यासारख्या कौशल्यांची निवड करणे खूप महत्वाचे आहे.

प्रश्नः कोविड 19 नंतर नोकरीच्या कामात बदल झाला आहे का?

उत्तरः साथीच्या काळात प्लेसमेंट डिजिटलवर हलले आहे. एचआर विभागातील लोक आता झूम सारख्या प्रणालीचा वापर करून ऑनलाईन मुलाखत घेत आहेत. पारंपारिक ऑन-बोर्डिंग प्रक्रियेचे आभासीकरणही केले गेले आहे. तर होय, निवडलेले उमेदवार ओळखण्यासाठी एआय आणि बिग डेटासह नवीन उमेदवारांचा वापर केला जाईल, जो की पूर्वीसारखाच राहील.

प्रश्नः या कठीण काळात मुलाखतीची तयारी कशी करावी?

उत्तरः उद्योगासंदर्भात विशिष्ट कौशल्ये मिळविण्यासाठी उमेदवाराला स्वतःचं अप-स्किलिंग आणि री-स्किलिंग करणे आवश्यक आहे. यासाठी वेगवेगळे डिजिटल प्लॅटफॉर्म वापरावेत. आपण त्यांच्याकडून प्रमाणपत्र देखील मिळवू शकता. मुलाखतीच्या तयारीसाठी कंपनीच्या उद्दीष्टांवर फोकस करावा. त्याबद्दल वेबवर संशोधन करावे आणि त्याची अधिक माहिती मिळवावी. यासाठी मार्गदर्शक किंवा प्रशिक्षकांची मदत घ्यावी लागेल.

प्रश्नः सध्याच्या परिस्थितीत कोणत्या प्रकारचे करियर स्वीकारले जाऊ शकते?

उत्तरः सध्याच्या काही नोकर्‍या ह्या पुढील पाच वर्षांत ट्रेंडच्या बाहेर असतील. तंत्रज्ञानाच्या सुधारणेमुळे कंपन्या त्यांचे मनुष्यबळ कमी करण्यासाठी हालचाली करतील. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक फ्यूचर ऑफ जॉबच्या अहवालानुसार ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि एआय मोठ्या प्रमाणात 7.5 दशलक्ष नोकर्‍या उपलब्ध होतील. यात डेटा अ‍ॅनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, एआय आणि एमएल स्पेशलिस्ट, प्रोसेस ऑटोमेशन स्पेशालिस्ट, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन स्पेशलिस्ट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी स्पेशालिस्ट आणि डिजिटल टेक्नॉलॉजी संबंधित नोकर्‍यांची मागणी अधिक असेल. कार्यात्मक भूमिका, विपणन आणि विक्री भूमिका आणि इतर कार्यकारी भूमिका देखील मागणीमध्ये कायम राहतील. कंपन्या आता इथून पुढे उमेदवारांना निवडताना खूप बारीकतेनं विचार करतील. तसेच तो चालू घडामोडीविषयी किती प्रमाणात अपडेट आहे, हे पाहिल.

प्रश्नः कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मोठा डेटा विचारात घेतल्यास भविष्यात कोणते बदल पाहिले जाऊ शकतात?

उत्तरः साथीच्या रोगाच्या अगोदर एआय, एमएल आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स होते, परंतु गेल्या एका वर्षात त्यांना अवलंबण्याच्या वृत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. मोठा डेटा सर्वकाही बदलतो आणि प्रत्येक व्यवसाय आता एक सॉफ्टवेअर बनत आहे. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने आयटी संदर्भातही अनेक प्रकाचे बदल आपणाला पहायला मिळतील.

प्रश्नः आपल्या कंपनीच्या निवड प्रक्रियेबद्दल सांगा?
उत्तरः नोकरी शोधणार्‍या उमेदवारांनी आमच्या https://www.skillsoft.com/about/careers वेबसाईटवर संपर्क साधावा. त्यांना ती माहिती मिळून जाईल.

प्रश्नः आपल्या कंपनीत आणि या क्षेत्रात वाढीच्या संभाव्यता काय आहेत?
उत्तरः स्किलसॉफ्टवर आमचा विश्वास आहे की प्रत्येकामध्ये आश्चर्यकारक अशा प्रकारची क्षमता आहे. आम्ही सर्व ‘मेकिंग वर्क मॅटर’ यावर काम करत आहे.