खुशखबर ! ‘कोरोना’विरूद्ध दुहेरी मारा करणारी आणखी एक वॅक्सीन ट्रायलमध्ये यशस्वी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी आणखी एक वॅक्सीन यशापर्यंत पोहचत आहे. आता आणखी एका कंपनीने दावा केला आहे की, त्यांची वॅक्सीन कोरोना व्हायरसपासून बचाव करत आहे. सोबतच शरीरात इम्युनिटीत वाढ करत आहे. म्हणजे ही वॅक्सीन कोरोना व्हायरसला नष्ट करेल आणि सोबतच भविष्यात कोरोनाचा हल्ला होऊ नये यासाठी शरीरात उच्च स्तराचे अँटीबॉडीज सुद्धा तयार करेल.

या औषध कंपनीचे नाव आहे नोवावॅक्स. नोवावॅक्स कंपनीची कोरोना वॅक्सीन एनव्हीएक्स-कोव्ह 2373 च्या यशाची घोषणा झाल्यानंतर तिच्या शेयरमध्ये 10 टक्केंची वाढ झाली आहे.

नोवावॅक्सने म्हटले आहे की, आमच्या कोरोना वॅक्सीनची शेवटच्या स्टेजची तिसरी ट्रायल सप्टेंबरच्या अखेरीस संपेल. यानंतर आम्ही पुढील वर्षी म्हणजे 2021 मध्ये 100 कोटी ते 200 कोटी वॅक्सीनचे उत्पादन करण्यास सक्षम असू.

नोवावॅक्सचे प्रमुख ग्रेगरी ग्लेन यांनी म्हटले की, मला विश्वास आहे की, शेवटच्या स्टेजच्या डेटामुळे आम्हाला सरकारकडून औषध बनवण्याची परवानगी मिळेल. ही परवानगी आम्हाला या वर्षी डिसेंबरच्या सुरूवातीला मिळण्याची आशा आहे.

मेरीलँड येथील नोवावॅक्सची वॅक्सीन एनव्हीएक्स-कोव्ह 2373 च्या बाबत म्हटले जात आहे की, ही शरीरात कोरोनाविरूद्ध उच्च स्तराचे अँटीबॉडीज बनवत आहे. सोबतच कोरोना व्हायरसला नष्ट करण्यास मदत करत आहे. यासाठी कंपनी दावा केला आहे की, ही वॅक्सीन कोरोनावर दोन्ही बाजूने मारा करत आहे.

नोवावॅक्सची वॅक्सीन एनव्हीएक्स-कोव्ह 2373 चे दोन डोस घेतल्यानंतर कोविड-19 रूग्ण पूर्णपणा बरा होत आहे. ही वॅक्सीन अमेरिकन सरकारद्वारे चालवण्यात येत आलेल्या ऑपरेशन वार्प स्पीडच्या अगोदरच्या काही प्रोग्राम्सपैकी आहे, ज्यास व्हाईट हाऊसकडून फंडिंग मिळाले आहे.

नोवावॅक्सची वॅक्सीन एनव्हीएक्स-कोव्ह 2373ने कोरोना व्हायरसच्या पृष्ठभागाला सिंथेसाईज करून ठिक करते. प्रोटीनने तयार हा पृष्ठभाग मनुष्याच्या शरीरात घुसून आणखी व्हायरस निर्माण करतो. यासाठी तो आपल्या शरीरातील पेशींचा अधार घेतो.

नोवावॅक्सने म्हटले की, ते एनव्हीएक्स-कोव्ह 2373 वॅक्सीनचे उत्पादन डिसेंबरपासून सुरू करू शकतात. जर सरकारकडून परवानगी मिळाली तर कंपनीचे टार्गेट आहे की, जानेवारी 2021 मध्ये 10 कोटी डोस बनवले जावेत.

नोवावॅक्सची वॅक्सीन एनव्हीएक्स-कोव्ह 2373 ची ट्रायल मेच्या अखेरीस सुरू झाली होती. तिने आतापर्यंत 18 ते 59 वर्षांच्या 106 कोविड-19 रूग्णांना बरे केले आहेत. फेज-1 च्या स्टडीपूर्वी सध्या हेच निकाल समोर आले आहेत. ज्यामुळे कंपनीचे शेयर वाढले आहेत.