‘कोरोना’ नाकावाटे घुसू शकतो मेंदूत, नवा निष्कर्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आद्याप कोरोनावर कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. दरम्यान, कोरोनाच्या लक्षणांमध्ये बदल होताना दिसत आहे. आता एक नवी बाब समोर आली आहे. कोरोना विषाणू नाकावाटे मेंदूत शिरकाव करू शकतात, अशी भीती एका संशोधनाअंती व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाचा सुरुवातीच्या काळात सर्दी, खोकला आणि घशात खवखव होणे हीच लक्षणं सांगण्यात येत होती. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या लक्षणांमध्ये भर पडत गेली. काही दिवसानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना गंध न येणे, चव जाणे ही लक्षणं दिसून येऊ लागली. ही कोरोनाची लक्षणं असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्यांचा कोरोनाच्या लक्षणांमध्ये समावेश केला होता.

दरम्यान, जर्मनीमधील बर्लिन येथील चारिटे युनिर्व्हसिटी मेडिसीन संस्थेनं केलेल्या संशोधनाचा अहवाल नेचर न्युरोसायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. सार्स सीओव्ही २ (कोविड) केवळ मानवी श्वसन संस्थेवरच परिणाम करत नाही. तर मज्जासंस्थेवरही परिणाम करत आहे. याचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे गंध न येण चव जाणे, डोकेदुखी, थकवा, मळमळ आणि उलट्या यासारख्या न्यूरोलॉजिक लक्षणांचा एक तृतीयांशपेक्षा जास्त व्यक्तींना त्रास होतो, असं अभ्यासात म्हटलं आहे. या अभ्यासात हा धोका व्यक्त करण्यात आला आहे.

संशोधकांनी सांगितलं, की त्यांना सार्स-सीओव्ही २ चे अनुवांशिक घटक मेंदू आणि श्वसन नलिकेच्या भागात दिसून आले. विषाणूचे कणही आढळून आले आहेत. संशोधकांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३३ रुग्णांच्या मेंदूचा अभ्यास केला आहे . या अभ्यासात श्वसननलिकेशी जोडलेल्या घशाच्या वरच्या भागात परिक्षण करण्यात आलं. यात २२ पुरूष व ११ महिला होत्या. ज्या ठिकाणी कोरोनाचा सर्वात आधी संसर्ग होतो. या रुग्णांचं मृत्यूवेळी वय ७१ होतं. तर कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानंतर ३१ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं अभ्यासकांनी सांगितलं.

You might also like