खुशखबर ! आता QR कोड स्कॅन करून काढा ATM मधून पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एटीएम मशीनमध्ये विना कार्ड पैसे काढता यावेत यासाठी काही बँकांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये भारतातील महत्वाची असलेली बँक ऑफ इंडियाने सर्वात आधी या सेवेची सुरुवात केली आहे. यामध्ये तुम्ही  क्यूआर कोड स्कॅन करून एटीएम मधून पैसे काढू शकता. यासाठी बँकेने एटीएममध्ये यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस याच्या मदतीने क्यूआर कोड नावाच्या नवीन प्रणालीचा समावेश केला आहे.

एका वेळी काढू शकणार 2000 रुपये

या सुविधेची माहिती देताना बँक ऑफ इंडियाचे चेअरमन जी पद्मनाभन यांनी सांगितले कि, या नवीन  ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी आम्ही याला चालना देणार आहोत. नागरिकांना जर हि सेवा आवडली तर याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यासाठी आम्ही एटीएम मशीनमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था देखील पुरवणार आहोत. यासाठी कोणत्याही प्रकारच्या कार्डची आवश्यकता भासणार नाही. मात्र या सुविधेद्वारे तुम्ही एका वेळी फक्त 2000 रुपयेच काढू शकता.

या शहरांत मिळणार नवीन सुविधा

जी पद्मनाभन यांनी सांगितले कि, सध्या हि सेवा मुंबई, दिल्ली आणि चेन्नईमध्ये सुरु करण्यात आली असून पुढील सहा महिन्यात संपूर्ण देशभरात हि सुविधा पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे.