फायद्याची गोष्ट ! ‘या’ पद्धतीनं बुक करा LPG गॅस सिलिंडर, अन् करा थेट 50 रुपयांची बचत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   LPG Gas सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसात गॅस सिलिंडरची किंमत दोन वेळ वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत सिलिंडर 75 रुपयांनी महाग झाला आहे. अशात तुम्हाला जर कमी किंमतीचा सिलिंडर घ्यायचा असेल तर ही चांगली संधी आहे. तुम्ही बाजारभावापेक्षा 50 रुपये कमी देऊन गॅस सिलिंडर घेऊ शकता. इंडेन (Indane) या सरकारी कंपनीनं ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. स्वस्तात गॅस सिलिंडर कसा बुक करता येईल याची आपण माहिती घेऊयात.

इंडियन ऑईलच्या ट्विटनुसार तुम्ही आता अ‍ॅमेझॉन पे द्वारे एलपीजी गॅस सिलिंडर बुक करू शकता. या माध्यमातून ग्राहकांना प्रथमच सिलिंडर बुकिंगवर 50 रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. कंपनीनं याबाबत सागितलं आहे. हा कॅशबॅक फक्त एकदाच दिला जाणार आहे.

कसा बुक करा सिलिंडर ?

यासाठी प्रथम अ‍ॅमेझॉन पे च्या पेमेंट ऑप्शनवर जावं लागेल यानंतर आपला गॅस सेवा प्रदाता निवडावा लागेल. इथं तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा एलपीजी गॅस नंबर भरावा लागणार आहे. तुम्हाला अ‍ॅमेझॉन पे द्वारे पेमेंट करावं लागणार आहे.

या क्रमाकांवर बुक करा सिलिंडर

देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीनं सर्व सर्कलसाठी एकच क्रमांक जारी केला आहे. याचा अर्थ असा आहे की, आता इंडेन गॅस ग्राहकांना देशभारत एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी 7718955555 या क्रमांकावर कॉल किंवा SMS पाठवावा लागणार आहे.