Flipkart देतय आहे खास ‘ऑफर’, फक्त 10% बुकिंगची रक्कम देऊन कराहवाई ‘सफर’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट (Flipkart) ने हवाई प्रवाशांसाठी नवीन ऑफर आणली आहे. ऑनलाइन वस्तू विक्रेता कंपनी फ्लिपकार्टने आता हवाई तिकिटांचे बुकिंग सुरू केले आहे. कंपनीचे फ्लाइट बुकिंग पोर्टल लाईव्ह झाले आहे. फ्लिपकार्टवर फ्लाइट तिकीट बुकिंगवर बऱ्याच ऑफर्स मिळत आहेत. तिकिट बुकिंगच्या वेळी केवळ 10 टक्के रक्कम भरून वापरकर्ते हवाई प्रवास करू शकतात. आपण उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये भरू शकतात. म्हणजेच फ्लिपकार्टवर तुम्ही ईएमआयमध्ये तिकिटही बुक करू शकता.

मिळणार या विशेष ऑफर

– तुम्ही फ्लिपकार्टवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांसाठी तिकीट बुक करू शकता. फ्लिपकार्ट पोर्टलवर बुकिंग करण्यावर अनेक ऑफर्स मिळत आहेत. प्रथमच, या पोर्टलद्वारे तिकिट बुक करणारे ग्राहक FKNEW10 कूपन वापरुन तिकिट दरावर 10% सूट मिळवू शकतात.

– FKDOM कूपन कोडसह देशांतर्गत उड्डाणांवर 2,500 रुपयांची सूट असेल. याशिवाय फ्लिपकार्टच्या राऊंड ट्रिप बुकिंगवर RNDTRIP वापरुन तुम्हाला 600 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळू शकेल.

– FLYTWO कूपन कोड वापरुन तुम्हाला 750 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळू शकेल.

विमानाने करू शकता विनामूल्य प्रवास

फ्लिपकार्टचे नियमित वापरकर्ते तिकिट बुकिंगमध्ये त्यांचे सुपरकॉईन्स वापरू शकतील. तुम्ही तिकीट बुकिंगच्या वेळी सुपरकॉईन्सचे रिडीम करण्यात सक्षम असाल. जर वापरकर्त्याकडे फ्लिपकार्ट सुपरकॉईन्सची संख्या जास्त असेल तर ते विनामूल्य प्रवास करण्यास सक्षम असतील. फ्लिपकार्टवर खरेदी करून तुम्ही सुपरकॉईन्स मिळवू शकतात.

कोरोना विषाणू आणि लॉकडाऊन संदर्भात वेबसाइटवर एक लिंक देखील आहे जी वापरकर्त्यांना सांगेल की त्यांच्या राज्यात प्रवास करण्यासाठी कोणकोणते नियम लागू आहेत. या लिंकमध्ये ‘सुरक्षित प्रवासाची मार्गदर्शक तत्वे, रद्दबातल धोरण, प्रवासादरम्यान कोविड-19 च्या विरूद्ध संरक्षणाचे उपाय’ आणि इतर बर्‍याच गोष्टी लक्षात घेऊन त्या लिंकमध्ये जोडण्यात आल्या आहेत.