आता ‘ही’ कंपनी ‘सुतार’, ‘प्लम्बर’ आणि ‘इलेक्ट्रीशियन’ला देखील सहज देणार 50 लाखापर्यंतचं गृह कर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : ICICI Home Finance ने दिल्लीत असंघटित खेत्रात काम करणार्‍या कुशल मजूरांसाठी नवी लोन स्कीम ’अपना घर ड्रीम्ज’ची सुरूवात केली आहे. कंपनी या स्कीमअंतर्गत दोन लाख रूपयांपासून 50 लाख रुपयांपर्यंत लोन देईल. ही स्कीम कारपेन्टर, प्लम्बर, इलेक्ट्रिशियन, टेलर, पेन्टर, वेल्डर, ऑटो मॅकेनिक, मॅन्युफॅक्चरिंग मशीन ऑपरेटर, कम्प्यूटर मॅकेनिक्स, आरओ रिपेयर टेक्नीशियन, छोटे आणि मध्यम उद्योगांचे मालक आणि किराणा दुकान चालवणार्‍यांसाठी आहे.

आयसीआयसीआय होम फायनान्सकडून जारी एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, ही लोन स्कीम देशातील अनौपचारिक क्षेत्रातील लोकांसाठी आहे, ज्यांना आपले घर खरेदी करायचे आहे, परंतु लोन घेण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्र गोळा करू शकत नाहीत.

कंपनीकडून जारी जाहिरातीत म्हटले आहे की, 20 वर्षांच्या कालावधीच्या कर्जासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड आणि सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट यासारखी कागदपत्र आवश्यक असतील. पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ग्राहकाच्या खात्यात 1,500 रुपयांची किमान रक्कम असली पाहिजे. तर, दहा लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी 3,000 ची रकम असायला हवी.

आयसीआयसीआय होम फायनान्सचे एमडी आणि सीईओ अनिरुद्ध कमानी यांनी सांगितले की, आयसीआयसीआय होम फायनान्समध्ये आमचे लक्ष्य इकॉनॉमीशी संबंधीत अनौपचारिक क्षेत्रातील कर्मचारी आणि स्थानिक स्तरावर उद्योग करणार्‍या लोकांचे आपल्या घराचे स्वप्न साकार करायचे आहे.

कमानी म्हणाले, आमच्या शाखांचे कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांना स्थानिक अर्थव्यस्थेचे ज्ञान असते, तसेच आमची कायदा टीम आणि टेक्निकल एक्सपर्ट कमीत कमी कागदपत्रांसह होम लोनच्या अर्जावर त्वरीत कार्यवाही करतात. ग्राहक पंतप्रधान आवास योजनेचे सर्व लाभ प्राप्त करू शकतात. ही कमी उत्पन्नवाले गट आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर आणि मध्ये उत्पन्न गटांसाठी क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम आहे.