वाहनावरुन ‘प्रवास’ करताना आता 4 वर्षांवरील मुलांनी ‘हेल्मेट’ सक्तीचे

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – देशात नवा मोटार वाहन कायदा लागू करण्यात आल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणं वाहन चालकांना महागात पडत आहे. मोटार वाहन कायदा अत्यंत कडक करण्यात आला असून वाहतूकीचे नियम मोडल्यास त्यावर द्यावा लागणारा दंड देखील भरघोस आहे. इतके की काहींनी आपल्या वाहनाच्या किंमतीपेक्षा जास्तीचे दंडाचे चलन कापले आहे. परंतू आता नव्या नियमानुसार हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार आता 4 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लहान मुलांना देखील वाहनावरुन प्रवास करताना हेल्मेट घालणे आवश्यक असणार आहे. पालक आपल्या मुलांना गाडीवर कुठेही घेऊन जात असतील तर आता 4 वर्षांवरील मुलांनी हेल्मेट घालणे आवश्यक असेल.

या नव्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. लहान मुलांनी आता वाहनावरुन प्रवास करता त्यांच्या सुरक्षेचा विचार करुन हेल्मेट घालण्याचा नियम आणण्यात आला आहे. त्यामुळे आता लहान मुलांना देखील हेल्मेट सक्ती सुरु झाली आहे. त्यामुळे आपल्या लहान मुलांना घेऊन वाहनावरुन पालकांना प्रवास करताना स्वत:सह मुलांनीही हेल्मेट घालावे लागणार आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. परंतू याला अनेक शहरातून विरोध करण्यात आला. हेल्मेट घालणे हे सक्तीचे नसावे असे मत अनेकांनी मांडले. परंतू आता देशात नवे वाहतूक नियम लागू झाल्यानंतर वाहन चालवताना हेल्मेट न वापरल्यास भरघोस दंड भरावा लागत आहे. त्यामुळे आता लहान मुलांना देखील सुरक्षेचा विचार करुन हेल्मेट घालण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. यानंतर अनेक शहरातून संमिक्ष प्रतिक्रिया उमटत आहेत.

Visit : Policenama.com