आता बाजारात विकला जाणार गायीच्या शेणापासून बनविलेला पेंट, केंद्र सरकार करणार लॉन्च, जाणून घ्या फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) गायीच्या (cow ) शेणापासून बनविलेले पेंट बाजारात आणणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हा पेंट मंगळवारी लाँच करणार आहेत. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या (केव्हीसी) मदतीने ही विक्री केली जाईल. हा शेणाचा पेंट जयपूरच्या युनिट कुमारप्पा नॅशनल हॅन्डमेड पेपर इन्स्टिट्यूटने तयार केला आहे. या पेंटला बीआयएस अर्थात भारतीय मानक ब्यूरोने देखील प्रमाणित केले आहे.

अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, इको फ्रेंडली पेंट
आयोगाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, शेणापासून बनविलेले हे पेंट अँटीफंगल, अँटीबैक्टीरियल आणि इको फ्रेंडली आहे. भिंतीवर पेंटिंग केल्यानंतर ते फक्त चार तासांत कोरडे होईल. गरजेनुसार यात रंग देखील मिसळला जाऊ शकतो . सध्या त्याचे पॅकिंग 2 लिटरपासून 30 लिटरपर्यंत तयार केले गेले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार शेतकरी व गोशाळांना प्रति गायीच्या शेणाच्या 30 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे.

शेणाचे चप्पल – शूज
अहमदाबाद येथील रहिवासी दिव्याकांत दुबे हे 55 वर्षांचे आहेत आणि गेल्या 8-10 वर्षांपासून ते शेणावर काम करीत आहेत. केवळ दहावी पास दिव्यकांत पेशाने पेंटर आहे. ते साइन बोर्ड रंगवून, मुर्त्या बनवून आपले जीवन जगतात, पण शेणावर काम करून त्यांना आनंद मिळतो. त्यांनी शेणापासून बरीच उत्पादने तयार केली आहेत. अलीकडे त्यांनी गायीच्या शेणासह चप्पल बनवल्या आहेत. मजबूत, टिकाऊ आणि आरोग्यासाठी उपयुक्त अशा या चप्पल फार पसंत केला जात आहेत.

अर्धा तास पाण्यात ठेवली तरीही तुटत नाही चप्पल
दुबे यांचे म्हणणे आहे की, गायीच्या शेणाने बनविलेली ही चप्पल आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली आहे. यामागील त्यांचा तर्क असा आहे की, प्राचीन काळी लोक शेणाने सारवलेल्या घरात अनवाणी पायाने राहत असत. त्याचा थेट फायदा त्याच्या आरोग्यास झाला. आता घरांना सारवणे शक्य नाही, परंतु शेणापासून बनवलेल्या चप्पल परिधान केल्याने शरीराला हे सर्व फायदे मिळू शकतात. याव्यतिरिक्त, जर या चप्पल अर्ध्या तासासाठी पाण्यात ठेवल्या तरीही त्या खराब होणार नाहीत आणि तुटणार नाहीत.

शेणापासून बनविलेल्या मुर्त्या इको- फ्रेंडली
चप्पल व्यतिरिक्त दिव्यकांत यांनी शेणाच्या मूर्ती बनवल्या आहेत. गणपती , लड्डू गोपाळ, राधा कृष्ण, सरस्वती, राम सीता इत्यादींच्या शेणाच्या मुर्त्या तयार केलेल्या आहेत. ते म्हणतात की, शेणाने बनवल्यामुळे मूर्ती पर्यावरण शुद्ध करतात. तसेच, ते पूर्णपणे ईको फ्रेंडली, ऑर्गेनिक आहेत. जिथे या विसर्जन केल्या जातात, ही त्या जमिनींना फायदा पोहोचविते. या मुर्त्या सहा इंचापासून अनेक फुटांपर्यंत आहेत.