आता पुणे-सिंगापूर थेट विमानसेवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

येत्या एक डिसेंबरपासून पुण्याहून सिंगापूरला जाण्यासाठी थेट सेवा सुरू करण्याचा निर्णय जेट एअरवेज कंपनीने घेतला आहे. या सेवेमुळे सध्याच्या तुलनेत प्रवासाचा कालावधी पाच ते सहा तासांनी घटणार आहे. कारण सध्या पुण्याहून सिंगापूरला विमानाने जाण्यासाठी कनेक्टिंग विमानाने १० ते १२ तासांचा कालावधी लागतो.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1f51852d-cea2-11e8-9b06-cdd97aa8ab9d’]

पुण्याहून दुबईला दोन, शारजाला एक, फ्रँकफर्टला एक थेट विमानसेवा सुरू आहे. जेट एअरवेजची सिंगापूर सेवा ही पुण्याहून पाचवी आंतरराष्ट्रीय सेवा ठरणार आहे. हे विमान पुण्यातून पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी उडणार आहे. तर, सिंगापूरहून भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजता ते निघणार आहे. पुणे ते सिंगापूर ही जेट एअरवेजची सेवा दैनंदिन असणार आहे. सध्या पुण्याहून सिंगापूरला जाण्यासाठी मुंबई, चेन्नई, बेंगळुरू किंवा कोलकात्यामार्गे जावे लागते. तेथून सिंगापूरला कनेक्टिंग विमानसेवा दिली जात होती. यामध्ये प्रवासासाठी ११ ते १२ तासांचा कालावधी लागत होता. तसेच, तिकीटही अधिक मोजावे लागत होते. पुणे ते सिंगापूर थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने केली होती. त्यानुसार मी हवाई नागरी वाहतूक मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला होता. या विमान सेवेमुळे नागरी वाहतूक, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली.

[amazon_link asins=’B075FYSN12′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2740295b-cea2-11e8-a2d0-1744978a799d’]

येत्या काळात लंडन आणि न्यूयॉर्कला थेट सेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षा मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष एस. के. जैन यांनी व्यक्त केली. पुणे आणि सिंगापूर दोन्ही शहरे एज्युकेशन हब आहेत. तसेच, या दोन्ही शहरांचे व्यापाराचे संबंधही असून, पर्यटनही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे थेट विमानसेवेमुळे या सर्वांना चालना मिळणार आहे. ही विमानसेवा वास्तविक खूप पूर्वीच सुरू होण्याची गरज होती. आता ही सेवा सुरू झाली. त्याचे आम्ही स्वागत करतो, असे जैन म्हणाले.

पुन्हा पेट्रोल-डिझेलची दरवाढ, नागरिक त्रस्त