आता विचारपुर्वक करा सर्व व्यवहार, लहान आणि दैनंदिन खर्चावर देखील इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा ‘वॉच’

नवी दिल्ली : आता कोणतेही ट्रांजक्शन विचारपूर्वक करा, कारण प्रत्येक छोट्या आणि मध्यम ट्रांजक्शनवर सुद्धा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे जास्त लक्ष आहे. यासाठी त्याचा सुद्धा हिशेब ठेवणे जरूरी आहे. पूर्वी इन्कम टॅक्सची नजर हाय व्हॅल्यू ट्रांजक्शनसारख्या क्रेडिट कार्डवरून 2 लाख रुपयांचा खर्च, 30 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रॉपर्टी खरेदी, बँकेत 10 लाख रूपयांपेक्षा जास्त डिपॉझिट, यावर होती. परंतु आता सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन खर्चावर सुद्धा मोदी सरकारचा आयकर विभाग लक्ष ठेवणार आहे. जाणून घ्या कोणत्या खर्चावर आहे आयटी डिपार्टमेंटची नजर…

या खर्चांवर आहे आयटी डिपार्टमेंटची नजर-

* वार्षिक 1 लाख रुपयांपेक्षा जास्त एज्युकेश फी भरणे
* वार्षिक 1 लाख रुपयांपेक्षा जास्त वीज बिल भरणे
* वार्षिक 20,000 रुपयांपेक्षा जास्त प्रॉपर्टी टॅक्स भरणारे
* हॉटलमध्ये 20,000 च्यावर खर्च

* व्हाईट गुड्सची खरेदी म्हणजे टीव्ही, फ्रीज, फोनवर 1 लाखापेक्षा जास्त खर्च
* हेल्थ इन्श्युरन्सचा प्रीमियम 20,000 रुपयांपेक्षा जास्त
* वार्षिक 50,000 रुपयांपेक्षा जास्त इन्श्युरन्स प्रीमियम भरणे
* परदेशी आणि स्थानिक विमानात बिझनेस क्लासमधून प्रवास
* डीमॅट ट्रांजक्शनसह शेयरची खरेद-विक्री
* 40,000 प्रति महीन्यापेक्षा जास्त भाडे
* बँकेत लॉकर्सवर सुद्धा नजर असेल

याशिवाय ही आणखी मोठी यादी आहे. टॅक्सपेयर्सला आता सतर्क राहावे लागणार आहे. खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ ठेवावा लागेल. अन्यथा उत्तर द्यावे लागेल. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नुकतीच ही यादी ट्विटरवर टाकली होती. मात्र, नंतर ती हटवली होती.

शेतजमीन विकलीत तरी टॅक्स भरा
शेतजमीन खरंतर कॅपिटल असेट्समध्ये येत नाही. कॅपिटल असेट्स म्हणून अ‍ॅग्रीकल्चरल लँड न येण्याचे काही नियम आहेत. 2, 6, 8 किलोमीटरच्या हिशेबाने लोकसंख्येची कमाल मर्यादा 10 लाख आणि किमान मर्यादा 10 हजार आहे. जर तुमची शेतजमीन म्युनसिपल हद्दीच्याबाहेर आहे तर ती कॅपिटल असेट मानली जाणार नाही. कॅपिटल असेटच्या कक्षेत आल्यानंतर कॅपिटल गेन्स टॅक्स लागेल आणि इंडक्सेशनचा फायदा मिळेल.