कोट्यावधी EPF खातेदारांसाठी मोठी खुशखबर ! EPFO नं केली ‘ही’ घोषणा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) नं शुक्रवारी संघटित क्षेत्रातील कामगारांना आता युनिर्व्हसल अकाऊंट नंबर (UAN) काढण्यासाठी आता ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळं कर्मचारी स्वतः ऑनलाइनव्दारे UAN मिळवु शकतात. सध्या कर्मचार्‍यांना UAN साठी संघटनेनं नेमलेल्यांकडून अर्ज करावा लागतो. आता EPFO च्या वेबसाईटवरून कर्मचारी स्वतः UAN बनवु शकतो.

65 लाख पेन्शनधारकांना विशेष सुविधा

EPFO नं 65 लाख पेन्शनधारकांसाठी पेन्शन पेमेंट सारखे इतर पेन्शन संबंधित कागदपत्रे डिजीलॉकरमध्ये डाऊनलोड करण्याची सुविधा सुरू केली आहे. कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी EPFO च्या 67 व्या स्थापना दिवशी या दोन्ही सुविधा सुरू केल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी ई-निरीक्षणाची देखील सुरवात केली आहे.

सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याची देखील तयारी

गेल्या काही दिवसांपासुन प्रसारमाध्यमांच्या अहवालात सांगितलं होतं की, EPFO पेन्शनची वय मर्यादा 58 वर्षावरून वाढवून 60 वर्ष केली जाणार आहे. याच्यासाठी EPF कायदा 1952 मध्ये बदल करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हे बदलण्याचं मोठं कारण म्हणजे जगभरात सर्वांनी ठरवलेलं वय असल्याचं सांगण्यात येत आहे.

जगभरातील बहुसंख्य पेन्शन फंडामध्ये पेन्शनचं वय 65 वर्ष ठरवलं आहे. त्यामुळे देशात EPFO पेन्शनचं वय बदलण्याची तयारी सुरू आहे. EPFO नं जर हे पाऊल उचललं तर नोकरदारांचे निवृत्तीचे वय देखील 2 वर्षांनी वाढणार आहे. बोर्डाकडून मंजूरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव कॅबिनेट मंजूरीसाठभ कामगार मंत्रालयाकडे पाठवणार आहे.

Visit : Policenama.com 

हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
 जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
 ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार