आता थेट ‘मिलिट्री’ हॉस्पीटलमध्ये उपचार घेऊ शकतात निवृत्‍त सैनिक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिमाचलच्या माजी सैनिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या माजी सैनिकांना आता थेट सैनिकी रुग्णालयात जाऊन उपचार घेता येणार आहे. पहिल्यांदा याच सैनिकी रुग्णालयात ईसीएचएस पॉली क्लिनिकमधून रेफर घ्यावा लागत होता. या सेवेचा लाभ माजी सैनिकांसह त्यांची पत्नी, आई वडील घेऊ शकतात. सैनिकी रुग्णालयाच्या उपचारात त्यांना प्राथमिकता देण्यात येईल.

परंतू आता फक्त 75 वर्षापेक्षा कमी वयाच्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना पॉली क्लिनिकमधून रेफर लिहून घ्यावे लागेल. 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या माजी सैनिकांना थेट सैनिकी रुग्णालयात दाखल होता येणार आहे. यामुळे त्यांच्या वेळेची बचत होईल, तसेच कागदपत्राच्या प्रकियेपासून सूटका होईल.

ईसीएचएस पॉली क्लिनिकच हमीरपूरच्या अधिकारी कर्नल कृष्ण चंद यांनी सांगितले की, ईसीएचएस सेंट्रल ऑर्गनायजेशनने 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना रेफर शिवाय सैनिकी रुग्णालयात जाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Visit – policenama.com