जुन्या वाहनांवर ‘हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट लावणं गरजेचं, सरकारनं दिली ‘ही’ मोठी सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही चारचाकी किंवा दुचाकी कोणतेही वाहन हाय सिक्युरिटी नंबर पेल्टशिवाय चालवत असाल तर लवकरच तुमच्या वाहनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावून घ्या. यासाठी परिवहन विभागने 236 डिलरला मान्यता दिली आहे. जे तुमच्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावतील.

आदेश असतानाही नाही लावण्यात आल्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट –
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देखील आतापर्यंत राजधानी दिल्लीत 50 लाख स्कुटर बाइक्सला आणि 21 लाख चार चाकींना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावलेल्या नाहीत. 2012 नंतर येणाऱ्या सर्व गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट पहिल्यापासूनच लावलेल्या आहेत. तर त्याआधीच्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नाहीत. 2 ऑक्टोबर 2018 सालानंतर 2.6 लाख गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यात आल्या आहेत.

236 वाहन डिलरची नेमणूक –
दिल्ली परिवहन विभागाने स्पेशन कमिश्नर केके दहिया यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयात जारी निर्देशनानुसार कलर कोडेड आणि होलोग्राम बेस्ट फ्यूल स्टीकर लावण्याचे आदेश देण्यात आले होते. हे आदेश यासाठी देण्यात आले होते कारण ओळख पटवणे सहज शक्य होईल. ते म्हणाले की दिल्ली पहिले राज्य आहे जेथे गाड्यावर स्टीकर लावण्यात आले आहेत. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर बोलताना ते म्हणाले की जुन्या गाड्यांच्या नंबर प्लेटसंबंधित दोनदा टेंडर काढण्यात आले होते. परंतू डिलरकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. त्यासाठी आता 236 वाहन डिलरला हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी निवडण्यात आले आहे.

यासाठी आहेत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट –
मंत्रालयातील एका आधिकाऱ्याने सांगितले की मंत्रालयाकडून सर्व गाड्यांवर एक एप्रिल 2019 पासून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यात आल्या आहेत. तसेच या संबंधित सूचना पत्र तीन महिन्यापूर्वी जारी करण्यात आले होते. त्यानंतर RTO नियमांकडे दुर्लक्ष करत नव्या गाड्यांवर सामान्य नंबर प्लेट लावून नोंदणी करण्यात येत आहे. यामुळे मंत्रालयाने पाऊल उचलेले आहे. मंत्रालयाच्या मते ऑटो डीलरला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावल्यानंतर त्या वाहनाचे डाटाबेस लिंक करणे आवश्यक केले आहे.

एचएसआरपीचे काय आहेत फायदे –
एचएसआरपीमध्ये कोणतीही बदल करता येत नाही. सध्याच्या नोंदणी मार्क, क्रोमियम – बेस्ड होलोग्राम स्टिकर असे असतील की काढण्याचा प्रयत्न केला तर खराब होतील. या स्टीकरवर गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरसह, रजिस्टर्ड अथॉरिटी, लेजर ब्रांडेड पारमनेंट नंबर, इंजिन आणि चेसिस नंबरची माहिती असेल.

जुन्या वाहनांसाठी धोरण –
मंत्रालयानुसार सध्याच्या वाहनांवर हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लागवण्यात येईल. जी तिसऱ्या रजिस्ट्रेशन मार्कबरोबर असेल. सध्या वाहनांवर लावण्यात येणाऱ्या नंबर प्लेट राज्य सरकारद्वारे अधिसूचित हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट निर्मात्यांना किंवा सल्पायर डिलरला सप्लाय करेल, जे जुन्या वाहनांवर लावण्यात येतील.

Visit : Policenama.com