खुशखबर ! मोदी सरकारकडून छोट्या व्यापार्‍यांना ५९ मिनिटात ५ कोटीचं कर्ज, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार देशातील छोट्या उद्योजकांना कर्ज देत आहे. सरकारने MSME साठी PSB Loan in ५९ Minutes सुविधा सुरु केली आहे. या अंतर्गत MSME साठी १ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज फक्त ५९ मिनिटात मिळू शकत होते. आता या सुविधेअंतर्गत कर्जाची रक्कम वाढून ५ कोटी रुपये करण्यात आली. आता फक्त ५९ मिनिटात MSME ला ५ कोटी रुपयांचे कर्ज मिळेल. या कर्जाची रक्कम ८ दिवसात तुमच्या खात्यात जमा होईल.

५९ मिनिटात ५ कोटी रुपयांचे कर्ज –
PSB Loans in ५९ Minutes अंतर्गत पार्टनर बँकांनी म्हणजे SBI, युनियन बँक ऑफ इंडिया, ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स, कॉर्पोरेशन बँक आणि आंध्रा बँकने कर्जाची मर्यादा ५ कोटी रुपयांपर्यंत केली आहे.
या कर्ज सुविधेत काही नव्या सुविधा देण्यात येणार आहेत, ज्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. कॉन्टॅक्टलेस व्यवसाय कर्जाची सुरुवात १ लाख रुपयाने होते आणि ५ कोटी रुपयांपर्यंत आहे. यावर व्याज ८.५ टक्कांपासून सुरु होते.

असे मिळवा कर्ज –
कर्ज घेण्यासाठी अप्लाय करायचे असल्यास MSME च्या https://www.psbloansin59minutes.com/signup वर जावे लागेल,
यात अर्ज करणाऱ्याला आपले नाव, ई मेल आयडी, फोन नंबर भरावा लागेल, यानंतर OTP टाकून पुढील प्रक्रिया सुरु होईल.

याची लागेल आवश्यकता –
GST आयडेंटिफिकेशन नंबर, GST यूजर आयडी आणि पासवर्ड, इनकम टॅक्स ई – फायलिंग पासवर्ड, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन किंवा बर्थ किंवा मागील ३ वर्षांची आयटीआर XMLफॉर्मेटमध्ये.
करंट अकाऊंट – नेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारे यूजरनेम, पासवर्ड मागील ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट, PDF, डायरेक्टर डिटेल्स – बेसिक, पर्सनल, KYC शैक्षणिक माहिती, फर्मचे ओनरशिप डिटेल्स, अर्ज मंजूर झाल्यास कन्वीनिएंस फी १००० रुपये + GST असणार आहे.