बेरोजगारांसाठी आगळया-वेगळया नोकरीची संधी ! 12 तास फक्त चप्पल घाला आणि 4 लाख रूपये कमवा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   कोरोनादरम्यान अनेक जणांच्या नोकरीवर गदा आली आहे. अनेकजण बेरोजगार होऊन घरात बसलेत. त्यांच्याकडे पुढचा काहीच प्लॅन नाही. जर तुम्ही सुद्धा यापैकी एक असाल तर तुम्हाला पैसे कमावण्याची चांगली संधी आहे. bedroomathletics.com या संकेतस्थळावर तुम्हाला याबाबतची सर्व माहिती मिळेल.

समाज माध्यमात एका चप्पल कंपनीच्या नोकरीबद्दल जाहिरात व्हायरल झाली आहे. त्यात तुम्हाला काही खास करायचे नाही. फक्त घरात बसून चप्पल घालून रिव्ह्यू करायचा आहे. तेवढच केल्यावर कंपनी तुम्हाला चार लाख रुपये वर्षाला पगार देणार आहे.

मागील वर्षी सुद्धा बेडरुम एथलेटिक्स नावाच्या कंपनीने ही नोकरीची जाहिरात दिली होती. त्याला जबरदस्त रिस्पॉन्स देखील मिळाला होता. या लिंकवर जाऊन तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता, जर तुमची सगळी माहिती त्यांना आवडली तर तुम्हाला ही नोकरी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नोकरीत तुम्हाला महिन्यातले केवळ २ दिवस चप्पल टेस्टिंग करायची आहे.

त्यात तुम्हाला दिवसातील १२ तास चप्पल घालून रहायचं आहे. जाहिरातीत कंपनीने सांगितले आहे की, यासाठी निवडल्या जाणाऱ्या व्यक्तीला कंपनी आणि दुसऱ्या नाइट विअर्सचेही कम्फर्ट टेस्टिंग करावं लागेल. तुम्हाला ही नोकरी हवी असेल तर तुम्हाला कंपनीच्या साइटवर जाऊन हे सांगावं लागेल की, तुम्ही परफेक्ट टेस्टर का आहात आणि कंपनीने तुम्हाला नोकरी का द्यावी? तुमचं उत्तर योग्य असेल तर तुम्हाला ही नोकरी मिळू शकते.

या लिंकवर जाऊन तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता. तुमची सगळी माहिती त्यांना आवडली तर तुम्हाला ही नोकरी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.