खुशखबर ! रेल्वेचं ‘ऑपरेशन ५ मिनिट’च्या माधून तात्काळ तिकीट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. तिकिटासाठी प्रवाशांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे प्रवासात जास्त वेळ हा तिकीट काढण्यातच जातो. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेने आपल्या प्रवाशांना पाच मिनिटांत तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी नवीन योजना आखली आहे.

प्रवाशांना लवकर तिकीट मिळावे यासाठी ‘ऑपरेशन ५ मिनिट’ हे नवीन अभियान सुरु करण्यात आले आहे. यासाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणात जनजागृती देखील केली आहे. ही माहिती जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत पोहोचावी यासाठी रेल्वने विविध स्थानकांवर पोस्टरद्वारे याची जाहिरात केली आहे.

जर एखाद्या प्रवाशाला पाच मिनिटात तिकीट मिळाले नाही तर तो प्रवासी पोस्टरवर दिलेल्या क्रमांकावर फोन करून यासंबंधी तक्रार नोंदवू शकतो. या तक्रारीची ताबडतोब रेल्वेकडून दखल घेतली जाणार असून यावर रेल्वे कारवाई करेल, असे आश्वासन या पोस्टरवर देण्यात आले आहे. भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी विविध पर्याय देत असते.

ऑनलाईन बुकिंगद्वारे सर्वात जास्त बुकिंग हे प्रवासी करत असतात. प्रत्यक्ष बुकिंग करण्यापेक्षा प्रवासी ऑनलाईन बुकिंगला प्राधान्य देत असल्याचे देखील रेल्वेकडून अनेक वेळा सांगण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रेल्वेने ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी नवीन यूटीएस अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही कोणत्याही गाडीचे तिकीट यापुढे बुक करू शकता. याविषयी रेल्वेच्या वतीने माहिती देताना सांगण्यात आले की, राजधानी आणि शताब्दीसारख्या गाड्यांची जवळपास ७० टक्के तिकिटे हे ऑनलाईनच बुक होत असतात.

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

 ‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

 ‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 ‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

 भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

 दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like