फक्त 194 रुपयांमध्ये मिळेल LPG सिलिंडर, Paytm नं आणली नवीन ऑफर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आता आपण स्वयंपाकघरात वापरत असलेले एलपीजी गॅस सिलिंडर 694 रुपयाऐवजी फक्त 194 रुपयात बुक करू शकता. ऑनलाइन पेमेंट कंपनी पेटीएमने ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. गॅस सिलिंडर बुकिंगवर कंपनी तुम्हाला 500 रुपयाचे कॅशबॅक देत आहे. याचा फायदा कसा घ्यावा हे जाणून घ्या..

पेटीएम कॅशबॅकची संधी देत आहे

प्राप्त माहितीनुसार, पेटीएम वरून एलपीजी बुक करून तुम्ही 500 रुपयांचे कॅशबॅक मिळवू शकता. यासाठी तुम्हाला पेटीएम अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल.

असा घ्या फायदा

कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी प्रथम तुम्हाला रिचार्ज व पे बिल्सच्या पर्यायावर जावे लागेल. येथे बुक सिलेंडर वर टॅप करा. येथे आपल्याला आपल्या गॅस सिलेंडरची माहिती द्यावी लागेल. आता पेमेंट करण्यापूर्वी, ऑफरवर FIRSTLPG प्रोमो कोड टाका.

प्रथमच गॅस बुकिंगवर मिळेल फायदा

पेटीएमकडून प्रथमच गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी तुम्हाला 500 रुपयांच्या कॅशबॅकचा लाभ मिळत आहे. गॅस बुकिंगसाठी तुम्हाला फक्त 694 रुपये द्यावे लागतील. 500 रुपये कॅशबॅक केवळ आपल्या पेटीएम खात्यावर परत येईल.