आता कोणालाही फॉलो न करता मिळवा ट्विटरवर अपडेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन, क्रीडा, राजकारण तसेच जगात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आधी ट्विटरवर येतात. यामुळे ट्विटर सोशल मीडियाचे महत्वाचे माध्यम बनले आहे. ट्विटर आता अधिक युझर फ्रेन्डली होणार आहे कारण आता ट्विटर लवकरच सब्सक्राईब टू कन्वर्सेशन फिचर आणणार आहे. या फिचरमुळे युजरला कोणालाही फॉलो न करता त्यांच्या ट्विटचे नोटिफिकेशन मिळणार आहे. सध्या मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर या फिचरचे टेस्टिंग करत आहे. या फिचरच्या अधिकृत लाँचिंगची घोषणा अद्याप झालेली नाही. ट्विटरने यासंबंधी एक ट्विट प्रसिद्ध केले आहे.

असे मिळवा अपडेट – या फिचरनंतर युजर कोणत्याही ट्विटला लाईक आणि रिप्लाय न करताच त्यासंबंधी अपडेट घेऊ शकणार आहेत. यासाठी युजरला केवळ सब्सक्राईब बटनवर क्लिक करावे लागणार आहे.

ट्विटर आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स सादर करत आहे. यापूर्वी ट्विटरवरील ट्विटमध्ये देखील एडिट करता येणारे फीचर आणण्याची घोषणा केली होती. ट्विटरचा अपेक्षीत उपयोग म्हणजे मायक्रो-ब्लॉगींग पण तेवढ्यावर मर्यादीत न राहता आता ट्विटर म्हणजे एक सोशल मेसेजींग टुल झाले आहे. आपण ट्विटर वापरुन सर्वांपर्यंत एकच संदेश एकाच वेळी पोहचवु शकता. ‘फॉलोअर्स’ आणि ‘फॉलो’ यामुळे ट्विटर हे एक मित्रांचे जाळेसुद्धा विकसित करू शकता.

Loading...
You might also like