खुशखबर ! ‘आरोग्य विमा’ काढणं झालं एकदम सोप, ‘हप्त्या’नं भरू शकता ‘प्रिमीयम’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हेल्थ इंश्योरेंस म्हणजेच आरोग्य विमाला प्रोस्ताहन देण्यासाठी इंश्योरेंस रेग्युलेटर IRDAI ने वर्षाला प्रीमियम भरण्याच्या जागी आता महिन्याला, तिमाहीला आणि सहामाहीला प्रीमियम देण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय आता इंश्योरेंस कंपन्या IRDAI च्या मंजूरीची वाट न पाहता आपल्या विमा प्रोडक्ट्समध्ये बदल करु शकतील. यात अतिरिक्त राइडर पासून जास्त वयापर्यंतचे इंश्योरेंस कवर देण्याचा समावेश आहे. या बदलामुळे पॉलिसी होल्डर्सला फायदा होणार आहे.

हेल्थ इंश्योरेंस होणार सोपा –
1. हेल्थ इंश्योरेंस प्रीमियमला माहिन्याला, तिमाहीला आणि सहामाहीला भरण्यास मंजूरी देण्यात आली.
2. आतापर्यंत वार्षिक प्रीमियमला मंजूरी होती.
3. इंश्योरेंस रेग्युलेटर IRDAI ने मंजूरी दिली.
4. कंपन्यांनी प्रोडक्ट्समध्ये छोटे बदल करण्यास मंजूरी
5. सर्टिफिकेशनच्या माध्यमातून प्रोडक्टमध्ये छोटे बदल करण्यास मंजूरी
6. IRDAI च्या मंजूरीशिवाय प्रोडक्टच्या प्रीमियममध्ये 15 % बदल करु शकतात.
7.कंपनी 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ग्राहकांना हेल्थ इंश्योरेंस देऊ शकेल.
8. हेल्थ पॉलिसी शिवाय अतिरिक्त राइडर, क्रिटिकल इलनॅस जोडू शकतील.

पॉलिसी होल्डर्सला फायदा –
1. पॉलिसी होल्डरला एकसाथ पूर्ण प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही.
2. हेल्थ इंश्योरेंसला प्रोस्ताहन मिळेल.
3. इंश्योरेंसचे डिस्ट्रिब्युशन वाढेल, पारदर्शकता वाढेल.
4. लोक जास्त रक्कमेच्या इंश्योरेंस कवर घेऊ शकतील.
5. ग्राहकांच्या गरजेनुसार कंपन्या प्रोडक्ट्स तयार करतील.
6. ज्येष्ठ नागरिकांना इंश्योरेंस कवरचा जास्त फायदा मिळेल.

 

Visit : policenama.com