भाजप शब्दाचा ‘खेळ’ कसे करू शकतं हे आता मला कळलं : उध्दव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता स्थापन न करण्याबाबत शिवसेनेला जबाबदार धरले आहे. या बाबतच्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर अनेक आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते म्हणून मी पाठींबा दिला होता. परंतु असं काही ठरलं नव्हतं हे तुम्ही बोलणार असाल तर मी खोटं बोलून शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच भाजप शब्दाचे खेळ कसे करू शकते हे आता मला कळाले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षाबाबतच्या फॉर्म्युल्याबद्दल देखील स्पष्टीकरण दिले.

अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याबाबत उद्धव ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
अडीच वर्षाबाबत अमित शहांनी कोणताही शब्द दिला नव्हता असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी फडणवीस खोट बोलत असल्याचे सांगितले. मी दिल्लीला गेलो नव्हतो, अमित शहा आणि फडणवीस येथे आले होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होत की उपमुख्यमंत्रीपद मिळेल. मात्र मी बाळासाहेबांना वचन दिलेलं आहे की मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनवेल म्हणून मी सत्तेमध्ये सम-समान वाटा मागितला आणि अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाची मागणी केली आणि अमित शहांनी तसे मान्य देखील केले होते असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सत्तेच्या लालसेपोटी भाजप खोटे बोलत असल्याचाही आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे शब्दाचे खेळ कसे करतात हे आता मला कळाले आहे. जो पर्यंत तुम्ही तुमचे खोटे मान्य करत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी बोलणार नाही असे देखील उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

गेल्या पाच वर्षात आम्ही कुठेही विकासकामांमध्ये राजकारण येऊ दिले नाही. त्यामुळे पाच वर्षात जनतेचे प्रश्न ठामपणे मांडले. म्हणूनच अनेकांना असे वाटले की, आम्ही विरोधात देखील आहोत परंतु जनतेसाठी आम्ही सतत विकासाचे काम केले. मात्र भाजपकडून अनेकदा खोटेपणाचे आरोप झाले असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Visit : Policenama.com 

 

You might also like