गुन्हा दाखल झाल्यामुळे पंकजा मुंडे भडकल्या, म्हणाल्या…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –   जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन दसरा मेळावा (dussehra Melava) घेतल्याबद्दल माजी मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्यासह तीन आमदार, खासदार व इतर 50 एशा एकूण 55 जणांवर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे समजताच पंकजा यांनी संताप व्यक्त केला आहे. पंकजा यांनी त्या संदर्भात एक सूचक ट्विट केलं आहे.

दसऱ्याच्या निमित्तानं पंकजा यांनी रविवारी सावरगाव (savargaon) येथून ऑनलाइन (online) मेळाव्याला संबोधित केले. मात्र, मेळावा ऑनलाइन असतानाही प्रत्यक्षात तिथे पंकजा उपस्थित होत्या, तिथं कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी पकंजा यांच्यसह 55 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये खासदार डॉ. भागवत कराड, महादेव जानकर (mahadev jankar), आमदार मोनिका राजळे, जिंतूरच्या मेघना बोर्डिकर, माजी आमदार भीमराव धोंडे यांचा समावेश आहे.

पंकजा यांनी या कारवाई बद्दल ट्विट केलं आहे. अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पाहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचे सत्र माझ्यापर्यंत आलं तर… असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राज्यात आतापर्यंत अनेक नेत्यांनी दौरे केले. त्यांच्या दौऱ्यांतही गर्दी झाली मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असंही त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.