आता फक्त ५ रुपयापासून करा म्यूचुअल फंडात गुंतवणूक, फायदा करून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – म्यूचुअल फंडात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर असून लवकरच तुम्ही यामध्ये 5 रुपयांची देखील गुंतवणूक करू शकता. यासाठी त्यांनी नवीन योजना आणली असून ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत तुम्ही प्रत्येक महिन्याला तुम्हाला हवी तितकी रक्कम जमा करू शकता. सामान्यपणे अशी योजना इक्विटी म्यूचुअल फंडात असते. मात्र या नवीन योजनेद्वारे तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे शेअर बाजारात उतार चढाव आले तरी तुमची गुंतवणूक मात्र सुरूच राहते.

एएमएफआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी एनएस वेंकटेश यांनी याविषयी सांगितले कि, तंत्रज्ञानाच्या मदतीने हि पाच रुपयांची गुंतवणूक तुम्ही करू शकता. आधार कार्डमुळे लहान शहरांतील ग्राहकांना याकडे आकर्षित करण्यात मदत होत असून म्युचुअल फंडावरील लोकांचा भरोसा अजूनही आहे. बाजारातील उतार-चढावामुळे नागरिक गुंतवणूक कमी जास्त करत आहेत. पुढील 8 ते 10 महिन्यात हि योजना सुरु करणार आहोत.

दरम्यान, या योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी वयाची कोणतीही अट नाही. यामध्ये कोणताही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो. थोड्या कालावधीसाठी जर धोका पत्करण्यासाठी व्यक्ती तयार असेल तर तुम्हाला या योजनेत मोठा फायदा मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –