आता इन्व्हेस्टमेंट दुरुस्त करण्याची वेळ, जाणून घ्या काय आहे नवीन टॅक्स स्लॅब ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता या आर्थिक वर्षात फायनल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी 31 मार्चपर्यंतच वेळ आहे. मागचे आर्थिक वर्ष 2020-21 चे बजेट सादर करताना अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्सशी संबंधीत प्रस्तावात मोठे बदल केले होते. एक नवा टॅक्स स्लॅब निवडण्याचा पर्याय देण्यात आला. हा प्रस्ताव आता सध्याचे आर्थिक वर्ष आणि पुढील आढावा वर्षासाठी लागू होईल. याच आधारावर आता सर्व नोकरदार लोकांना 31 मार्चपासून अगोदर आपली गुंतवणूक दुरूस्त करायची आहे. या प्रस्तावांबाबत अजूनही काही संभ्रम तुमच्या मनात आहे तर तो आम्ही येथे दूर करत आहोत.

टॅक्स प्रस्तावांबाबत संभ्रम
मागच्या वर्षी जेव्हा हे टॅक्स प्रस्ताव आले तेव्हा सर्वात जास्त संभ्रम लोकांमध्ये या गोष्टीचा होता की, नवीन टॅक्स स्लॅब निवडणे चांगले आहे की, जुना? आता डिडक्शनचा लाभ मिळेल किंवा नाही? जर नवीन सिस्टम वापरली तर पुन्हा जुन्यामध्ये जाता येईल का ?

नवी टॅक्स स्लॅबमध्ये जवळपास सर्व प्रमुख डिडक्शन बंद
एक्सपर्ट सांगतात की, एखाद्या वर्षात एखाद्या व्यक्तीला होम लोन किंवा इतर गुंतवणूक आहे तर त्याने जुन्या टॅक्स सिस्टममध्ये राहाणे चांगले आहे. जर एखाद्या वर्षी त्याला वाटते की, त्या वर्षी त्याचे होम लोन किंवा इतर कोणतीही प्रमुख गुंतवणुक नाही तर तो नवीन स्लॅब निवडू शकतो. परंतु, हे लक्षात ठेवा की, नवीन टॅक्स स्लॅबमध्ये जवळपास सर्व प्रमुख डिडक्शन बंद केले आहे.

टॅक्समध्ये मिळणार्‍या सुमारे 70 सवलती सोडाव्या लागतील
सरकार एकुण मिळून शंभरपेक्षा जास्त सवलती देत आहे. परंतु नवीन टॅक्स स्लॅबचा लाभ घेतल्यास टॅक्समध्ये मिळणार्‍या सुमारे 70 सवलती सोडाव्या लागतील. यामध्ये भत्ता (एलटीए), घरभाडे (एचआरए), मनोरंजन भत्ता, सॅलरीड क्लासला मिळणार्‍या 50,000 रुपयेपर्यंतच्या स्टँडर्ड डिडक्शनचा सुद्धा समावेश आहे.

नवीन टॅक्स सिस्टममध्ये इन्कम टॅक्स सेक्शन 80 सी, 80 डी, 24 च्या अंतर्गत मिळणार्‍या सवलती सुद्धा बंद केल्या आहेत.

केवळ या सवलीती आहेत :
नवीन टॅक्स व्यवस्थेत सध्या डेथ-कम रिटायरमेंट बेनिफिट, पेन्शन, रिटायरमेंटवर सुट्टीऐवजी कॅश, 5 लाख रुपयांपर्यत व्हीआरएस अमाऊंट, ईपीएफ फंड काढणे, शिक्षणासाठी स्कॉलरशिपवर मिळालेली रक्कम, सार्वजनिक हितासाठी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून मिळालेली रक्कम, नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत छोट्या कालावधी काढलेली रक्कम आणि मॅच्युरिटी अमाऊंट.

नव्या स्कीमचे कोणते फायदे :
समान्यपणे नवीन स्कीम वार्षिक 13 लाख रुपांपेक्षा कमी सॅलरीवाल्यांसाठी लाभदायक नाही. प्रत्यक्षात वेतनधारक लोकांना सध्या 50 हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन मिळते, याशिवाय त्यांना एलटीए आणि एचआरए सुद्धा मिळतो. जर त्यांनी नवीन व्यवस्था अवलंबली तर त्यांना पीएफमध्ये आपले योगदान, मुलांची ट्यूशन फी, विमा प्रीमियम, होम लोन इत्यादीवर मिळणारा लाभ सुद्धा मिळणार नाही. यासाठी जाणकार सांगतात की, नोकरदारांसाठी नवी स्लॅब सिस्टम उपयुक्त नाही.