बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाला ‘गीतकार’ जावेद अख्तरांचा ‘दुजोरा’ ! म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर आता एनसीबी या प्रकरणी चौकशी करत आहे. ड्रग अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूड घरघरात चर्चेचा विषय ठरत आहे. या विषयावर आता प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

जावेद अख्तर म्हणाले, “सुशांत प्रकरणात ज्याप्रकारे ड्रग कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं बॉलिवूडची प्रतिमा पुन्हा एकदा खराब झाली आहे. मी याबाबत केवळ ऐकलं आहे. मी माझ्या डोळ्यांनी केव्हाच ड्रग्स पाहिलं नाही. परंतु तरुण याचा वापर करतात हे मी ऐकलं आहे.” असं अख्तर म्हणाले.

पुढे बोलताना जावेद अख्तर म्हणाले, “चित्रपटसृष्टीच नाही तर ही समाजाची समस्या आहे ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मला तर हेही माहित नाही की काय वैध आहे आणि काय अवैध आहे. या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. ही समस्या मुळापासून संपवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like