SBI ग्राहकांसाठी खुशखबर ! फक्त एका WhatsApp वर ATM मशीन पैसे देण्यासाठी येईल तुमच्या घरी, जाणून घ्या

नवी दिल्ली : असे म्हटले जाते की, तहानलेल्या व्यक्तीला विहिरीजवळ जावे लागते. परंतु, एटीएम मशीनच्या बाबतीत असे होणार नाही. आता तुम्हाला कॅश घेण्यासाठी एटीएम मशीनपर्यंत जाण्याची गरज पडणार नाही. उलट, एटीएम मशीन पैसे देण्यासाठी तुमच्या घरापर्यंत येईल. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवी सेवा सुरू केली आहे. तुम्ही आता केवळ एक व्हॉट्सअप मॅसेजच्या मदतीने एटीएम मशीन आपल्या घरी बोलावू शकता.

एसबीआयने सुरू केली नवी सेवा
एसबीआयने आता आपल्या मोबाईल एटीएम मशीन घरोघरी नेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एसबीआयने ’आपकी मांग पर, एटीएम आपके द्वार पर’ ही सेवा सुरू केली आहे. बँकेने ग्राहकांना म्हटले आहे की, तुम्ही फक्त एक व्हॉट्सअप आम्हाला करा आणि आम्ही एटीएम मशीन तुमच्या घरासमोर घेऊन येऊ. तुम्ही मोबाइल एटीएम घरी बोलावण्यासाठी बँकेला फोनसुद्धा करू शकता. एसबीआयने या नवीन सेवेची सुरूवात लखनऊमध्ये केली आहे.

आता मिनिमम बॅलन्स आणि एसएमएस चार्ज नाही
एसबीआयने आपल्या ग्राहकांना आणखी एक भेट दिली आहे. एसबीआय मिनिमम बॅलन्स आणि एसएमएस चार्जेस ग्राहकांकडून घेणार नाही. बँकेने आता हे शुल्क माफ केले आहे. नुकतेच एसबीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. एसबीआयच्या 44 कोटीपेक्षा जास्त खातेधारकांना याचा लाभ मिळणार आहे.