आता ‘रोबोट’ करुन घेणार तक्रारी दाखल, पोलीस दलात CYBIRA ‘रोबोट’ दाखल

विशाखापट्टनम : पोलीसनामा ऑनलाइन – आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम पोलिसांनी एक नवा विक्रम केला आहे. त्यांनी आपल्या पोलीस दलात एका रोबोट CYBIRA (सायबर सुरक्षा इंटरेक्टिव रोबोट एजंट) समावेश करुन घेतला आहे.

हा रोबोट अत्यंत कुशल पद्धतीने लोकांच्या तक्रारी दाखल करुन घेईल व त्यांचा निपटारा करण्यात मदत करणार आहे. हा रोबोट महारानीपेटा पोलीस ठाण्यात तैनात करण्यात आला आहे. एक स्टार्ट अप कंपनी रोबो कपलर प्रा लि़. ने या रोबोटचे डिझाइन केले आहे. तो व्हॉइस रिकॉडिंग अथवा लेखी असलेली तक्रार स्वचलितपणे तक्रार घेणार आहे. या रोबोटला एकूण १३ कॅमरे लावण्यात आले आहेत.

Visit :  Policenama.com