कामाची गोष्ट ! आता Aadhaar नंबरव्दारे काढता येतील पैसे, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   Aadhaar इनेबल्ड पेमेंट सिस्टम सर्व्हिसद्वारे (AEPS) ग्राहकांना आता एटीएम प्रमाणेच आधार कार्ड मार्फत बँकेतून पैसे काढता येणार आहे. मात्र, त्यासाठी आधार कार्ड बँक अकाउंट सोबत लिंक असणे गरजेचं आहे. या अनुषंगाने देशात आता एटीएम कार्ड, पीन शिवाय बँकिंग व्यवहार करणे नागरिकांना सोप्पे होणार आहे.

कसे काढणार पैसे –

आजवर सर्व जण एटीएम-डेबिट कार्डच्या साहाय्याने पैसे काढत होते. परंतु, आता हे काम आधार कार्डच्या मदतीने करता येईल. Aadhaar आधारित ATM मशिनमार्फत पैसे काढता येणार आहेत.

हे कामे सुद्धा करता येतील –

या योजनेद्वारे पैसे काढण्याशिवाय, पैसे भरणे, बॅलेन्स चेक करणे, मिनी स्टेटमेंट काढणे आणि त्याद्वारे कर्ज सुद्धा घेतला येणार आहे. तद्वतच पॅन कार्ड, ई-केवायसी आणि कर्ज वितरणाच्या सुविधा याच्याअंतर्गत देण्यात येणार आहेत.

AEPS म्हणजे काय..?

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) Aadhaar आधारित पेमेंट (AEPS) निर्मिती केली आहे. त्यामार्फत बँक आणि वित्तीय संस्था आपल्या सेवा देण्याकरता आधार नंबर आणि यूआयडीएआय (UIDAI) ऑथेंटिकेशनचा वापर करतात. त्यास आरबीआयची (RBI) मान्यता आहे. या सुविधेद्वारे ग्राहकांचा मोबाईल नंबर आणि फिंगरप्रिंट, डेबिट कार्डप्रमाणे काम करेल. त्यामुळे ATM कार्डवेळी वापरला जाणारा पीन नंबरही टाकावा लागणार नाही.

Aadhaar मायक्रो एटीएम –

>> आधार मायक्रो एटीएम संशोधित पॉईंट ऑफ सेल (POS) डिव्हाइसप्रमाणे काम करते.

>> पीनलेस बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी याची सुरुवात केली जाणार आहे.

>> याप्रकारच्या ट्रान्झक्शेवर कोणताही चार्ज लागणार नाही.

>> एटीएम सारखे यामध्ये कॅश-इन आणि कॅश-आउट होणार नाही, तर आधार मायक्रो एटीएमद्वारा हे चालवले जाईल.