आता तुमच्या ATM कार्डव्दारे नाही होणार चोरी, क्लोनिंग आणि फसवणूक, ‘या’ स्टेप्सच्या माध्यमातून करा ATM ला ON/OFF

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   एटीएम (ATM) मधून कार्ड क्लोनिंगच्या घटना बर्‍याचदा आपल्या समोर येत असतात. एटीएममध्ये फसवणूकीची प्रकरणे आता सामान्य झाली आहेत. या घटना लक्षात घेता स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या खातेदारांसाठी नवीन सुरक्षा पॉलिसी आणली आहे. यामुळे आपले एटीएम कार्ड पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल. जर आपल्याला एटीएम फसवणूक, कार्ड क्लोनिंग यासारख्या घटना टाळायच्या असतील तर आपल्याला या पायऱ्यांचे अनुसरण करावे लागेल.

या स्टेप फॉलो करा

1. तुमच्या खात्यात मोबाइल नंबर नोंदविला आहे की नाही ते आधी तपासा.

2. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर SBI Quick Application डाउनलोड करा.

3. खाते सेवांमध्ये आपल्या नोंदणीकृत मोबाइलने खाते अपडेट करा.

4. एटीएम कार्डचे रिमोट आता आपल्या नियंत्रणाखाली आहे. एटीएम सेक्शन मध्ये आपण आपल्या मर्जीने एटीएम ऑपरेशन चालू किंवा बंद करू शकता. आपण फक्त एटीएम कार्डच्या शेवटच्या चार अंकांद्वारे हे करू शकता.

बँकेच्या लॉकरइतकेच सुरक्षित असेल एटीएम

बँकेचा असा दावा आहे की असे केल्यावर तुमचे एटीएम बँक लॉकरइतकेच सुरक्षित असेल. बंद झाल्यास, कोणताही अन्य व्यक्ती आपल्या कार्डमधून पैसे काढू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एटीएम ऑपरेशनच्या निर्देशांचे चांगल्या प्रकारे पालन करावे लागेल.